देवांची माहिती
सत्यं ज्ञानमनंतं ब्रम्हा । आनंदरुपममॄतं यद्विभाति ।
शांतं शिवमद्वैतं । शुद्धमपापविद्धम् ॥ १ ॥
अपाणि पादो जवनो गॄहीतां ।
पश्यत्यचक्षुः स शॄणोत्यकर्णः ।
सवेत्ति वेद्यं न च तस्यास्ति वेत्ता ।
तमाहुरग्रयं पुरुषं महांतम्॥ २ ॥
न सत्य प्रतिमा अस्ति ॥ ३ ॥
अर्थ:
"देव हा सत्यस्वरुप, ज्ञानरुप, व अनंत आहे. तो आनंदस्वरुप व अमर असून, सर्व जगात प्रकाशित होत आहे. तो शांत, मंगलमय असून, त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. (म्हणजे तो एकच आहे.) तो शुद्ध व पापरहित आहे ॥ १ ॥ त्या देवास हातपाय नाहीत. तरी तो ग्रहण करितो व लवकर जातो. त्यास डोळे नसून तो पाहतो व कान नसून तो ऐकतो. तो सर्व काही जाणतो, पण त्याला कोणी जाणू शकत नाही, त्यास महान् आदिपुरुष म्हणतात. ॥ २ ॥ त्याची प्रतिमा (मूर्ती) नाही. ॥ ३ ॥"
असा परमेश्वर आहे. तेव्हा त्याची वाटेल तशी प्रतिमा करुन व त्या प्रतिमेलाच देव समजून, वाटेल त्या प्रकारांनी पुजणे गौण आहे. परापुजाही असेच सांगते पाहा :
परापूजा
पूर्णस्यावाहनं कुत्र सर्वाधारस्य चासनं ।स्वच्छस्य पाद्यमर्घ्यं च शुद्धस्याचमनं कुतः ॥ १ ॥ निर्मलस्य कुतः स्नानं वस्त्रं विश्र्वोदरस्य च । निरालम्बस्योपवीतं पुष्पं निर्वासनस्य च ॥ २ ॥ निर्लेपस्य कुतो गंधो रम्यस्याभरणं कुतः । नित्यतृप्तस्य नैवद्यस्तांबूलं च कुतो विभोः ॥ ३ ॥ प्रदक्षिणा ह्यनंतस्य कुतो नतिः । वेदवाक्येरवैद्यस्य
कुत स्तोत्रं विधीयते ॥ ४ ॥ स्वयं प्रकाशमानस्य कुतो निरंजनं विभोः । अंतर्बहिश्र्च पुर्णस्य कथमुद्रासनं भवेत् ॥ ५ ॥ एवं परापूजा सर्वावस्थासु सर्वदा । एक बुध्यातु देवेश विधएया ब्रम्ह्यवित्तमैः ॥ ६ ॥
अर्थ: "जो सर्व व्यापक आहे त्याला अवाहन कोठून करावे ? जो सर्वाधार त्याला आसन, स्वच्छाला पाद्य व अर्घ्य, व धुद्धला आचमन कसे द्यावे ? निर्मळास स्नान, विश्र्वोद्धारास वस्त्र, निरालंबास यज्ञोपवीत, निर्वासास पुष्प, निर्लेपास गंध, रत्नास आभरण, नित्यतृप्तास नैवेद्य व तांबूल, अनंतास प्रदक्षिणा, अद्वयास नमन, वेदांसही जो अवेद्य त्यची स्तुती कशी करता येईल? स्वंयप्रकाशास निरांजनदीप , व्यापक अस्ल्यामुळे आतबाहेर सर्वत्र भरुन रहिलेला असा जो परनेश्वर त्याचे विसर्जन कसे बरे होऊ शकेल? अशी सर्व अवस्थेत सर्वदा टिकणारी परपूजा देवाच्या ठायी ब्रम्हवेत्ते एकाग्रबुद्धिरुप विधीने करतात." व कित्येक लोक मानसपूजा करतात, म्हणजे मनाने सर्व पूजा करतात, ती अशी-
मानसपूजा
अभंग
देवा देह पाट हॄदय संपुष्ट । आतं कृष्ण मूर्त । बैसविली ॥ १ ॥
भावें केलें गंध भक्तीच्या अक्षता । लाविल्या अनंता । निढळासी ॥ २ ॥
मन केले मोगरा चित्ते केले शेवंती । गळाहार प्रीती । समर्पिले ॥ ३ ॥
जाळूं क्रोधधूप उजळूं ज्ञानदीप । ओंवाळू स्वरुप । आम्ही त्याचे ॥ ४ ॥
तुका म्हणे पूजा केली भावें एका । पंचप्राणसखा । ओवाळूंनी ॥ ५ ॥
यावरुन पाहता परापूजा श्रेष्ठ, मानसपूजा मध्यम आणि प्रतिमापूजा कनिष्ठ दिसते, तरी लोक ती करतात? याचे उत्तर कित्येक असे देतात, की-
मूर्तीपूजा करण्याचे कारण
प्राणादिभिरनंतैश्र्च भावैरेतैर्विकल्पितः ।
मायैषा तस्य देवस्य यया संमोहितैः स्वयम् ॥ १ ॥
यं भावं दर्शयेद्यस्य तं भावं स तु पश्यति ।
तं चावति स भुत्वाऽसौ तद्ग्रःसमुपैति तम् ॥ २ ॥
अर्थ:
तो (ईश्र्वर) प्राण आदी अनेक रुपांचा आहे काहीम्नी कल्पिले आहे हा
सर्व या देवाच्या मायेचा प्रभाव आहे. ती माया कधी कधी त्यालाच मोह पाडते. ॥ १ ॥
'ईश्वर असा असा आहे' असे कोणी गुरुने त्यास तसा दिसतो. ईश्वर त्या रुपाचा
होऊन, त्या भक्ताचे रक्षण करतो व त्या बुद्धिने भक्ती करणारा त्याप्रते पावतो ॥ २ ॥
असे म्हणतात. म्हणून काही भाविक लोक देवाच्या वाटेल तशा मूर्ती बनवून, त्यांची
षोडशोपचारे किंवा पंचोपचार पूजा कतात. ते सोळा उपचार असे-
पुजेच्या षोडशोपचारांची नावे
आवाहनासनेपाद्यमर्ध्यमाचमनीयकम् ।
स्नानंवस्त्रोपवीतए च गधं पुष्पेच धूपकम् ।
दीपरन्न नमस्कारः प्रदक्षिणा विसर्जने ॥ १ ॥
अर्थ:
१.आवाहन (इष्ट देवतेस 'या' असे बोलावणे).
२. आसन(बसण्यास बैठक देणे).
३. पाद्य(पाय धुण्यास पाणी देणे).
४. अर्घ्य(हात धुण्यास पाणी देणे.)
५. आचमन (हातावर थोडे पाणी घेऊन पिणे.)
६. स्नान (अंग धुणें).
७. वस्त्र (नेसण्यास व पांघरण्यास कपडे देणे).
८. उपवीत (जानवे देणें).
९. गंध (चंदन लावणे.)
१०. पुष्प (फुले देणे)
११. धूप (ऊद जाळणे)
१२. दीप (फुलवात लावणे.)
१३. नैवेद्य (भोजन देणे).
१४. प्रदक्षिणा (फेरे घालणे).
१५.नमस्कार (पाया पडणे).
१६. विसर्जन (इष्ट देवतेस निरोप देउन पुजा समाप्ती करणे.).
पूजेच्या पंचोपचाराची नावें
गंधपुष्पधूपदीपौ नैवेद्यं पंचमं स्मृतं ।
'गंध,पुष्प, धूप, दीप,नैवेद्य हे पाच उपचार'. कोणी ह्या पाचच उपचारांनी बहुतेक पूजा करतात; त्यास 'पंचोपचार पुजा' म्हणतात.
पूजेचे साहित्य (सामान)
देवपुजेसाठी शुद्ध उदकाने भरलेला कलश (गडवा),शंख, घंटा, दिवा, देव्हाऱ्यात एक मंडपी, पळी, पंचपात्र, ताम्हण,गंध,धुतलेल्या शुभ्र अक्षता, फुले, बिल्वपत्र,(बेल) तुळशीपत्रे व मंजिरे, हळदीची पूड, कुकूं, बक्का, ऊद किंवा उदबत्ती, फुलावती, कापूर, विड्याची पाने, सुपारी, दही, दूध, तूप, साखर, मध,यज्ञोपवीत (जानवे), अबीर, गुलाल, केळी, नारळ, आंबे वैगरे फळे, दूर्वा, आघाडा, शमी वगैरे पत्री, आभरणे, कार्पासवस्त्रे, सेंदूर, नैवेद्य वगैरे
सामान जमविले पाहिजे.
पूजेची पूर्वयारी
प्रातःकाळी सूर्योदयापूर्वी उठून शौच, मुखमार्जन वगैरे झाल्यावर, पूजेसाठी फुले, तुळशी, बेल वगैरे सामान आणावे. नंतर स्नान करुन, स्वच्छ (सोवळी) वस्त्रे परिधान करावीत वस्त्रे श्क्यतो रेशमी असावीत. पूर्वेस तोंड करुन आसनावर बसावे. नंतर तिलकविधी संध्यावंदन वगैरे आन्हिक कर्म करावे.(संध्येची माहिती पुढे पंचमहायज्ञ प्रकरणामध्ये दिली आहे. असो.) नंतर देवघरात जाऊन, देवाच्यासमोर आसन मांडून, पूर्वेकडे तोंड करुन बसावे. नंतर उजवे बाजूस कलश, शंख, गंध, पुष्पे वगैरे सामान ठेवावे व डाव्या बाजूस दीप व घंटा ठेवून, पूजेस सुरुवात करावी.
पूजेच्या आरंभीची सूचना
पूजेच्या आरंभीस विष्णुच्या नावांनी आचमन, गणपती, इष्ट देवता, नवग्रह वगैरेंचे ध्यान, देशकालाचें उच्चाराचा संकल्प इत्यादी उरकून घेण्याची वहिवाट आहे. त्याप्रमाणे प्रथम त्याची व षोडशोपचार पूजेची संस्कृतमंत्रार्थांसह क्रमवार माहिती पुढे दिली आहे. त्याचा क्रम असा :
पुरानोक्त देवपूजा प्रारंभ
आचमन
देवपूजेस बसल्यावर प्रथमतः दोन वेळा आचमन करावे. म्हणजे तळहातावर थोडे उदक (पाणी) घेउन प्यावे. त्या वेळी मंत्र म्हणावे-
देवांची २४ नावे
केशवाय नमः। नारायणाय नमः। माधवाय नमः। गोविंदाय नमः। विष्णवे
नमः। मधुसुदनाय नमः। त्रिविक्रमाय नमः। वामनाय नमः। श्रीधराय नमः।
हृषीकेशाय नमः। प्द्मनाभाय नमः। दामोदराय नमः। संकर्षणाय नमः।
वासुदेवाय नमः। प्रद्युम्नाय नमः। अनिरुद्धाय नमः। पुरुषोत्तमाय नमः।
अधोक्षजाय नमः। नारसिंहाय नमः। अच्युताय नमः। जनार्दनाय नमः। उपेंद्राय
नमः। हरये नमः। श्रीकृष्णपरमात्मने नमः ॥ १ ॥
अर्थ:"केशवाला नमस्कार असो, नारायणाला नमस्कार असो." वगैरे म्हणून दोन वेळा आचमन केल्यावर गणपती, लक्ष्मीनारायण वगैरे देव आणि सूर्यादी नवग्रहांचे चिंतन करावे. त्या वेळी मंत्र म्हणावा-