-
Pr. घासून घ्यावें पण हासून घेऊं नये Suffer any thing, but incur not public ridicule.
-
उ.क्रि. १ घर्षण करणें ; चोळणें ; जोरानें पुसणें ; साफ करणें ; घासटणें . २ खरडणें ; झाजरणें ; ओरबडणें . ३ रागें भरणें ; कानउघाडणी करणें ; खरडपट्टी काढणें ; खडसणें . ४ वादविवाद , चर्चा , भवति न भवति , काथ्याकूट करणें . ५ ( एखाद्यास व्यवहारांत ) फसविणें ; बुडनिणें ; बुचाडणें . ६ ( ल . ) पुन : पुन : ( एखाद्या अभ्यासाची ) आवृत्ति करणें ; घोकणें ; पाठ करणें ; घट्ट करणें . हा श्लोक दहादां घासला म्हणजे पाठ होईल . ७ पढवून तयार करणें ; पढविण ; मेहनतीनें अभ्यास करविणें . हीं पोरें घासलीं पाहिजेत , तेव्हां दोन अक्षरें येतील . ८ ( ज्ञान इ० कांस ) उजळा देणें ; गंज घालविणें ; आवृत्ति करून ( ज्ञान इ० ) तयार ठेवणें . - अक्रि . १ घासलें जाणें . २ ( ल . ) ( एखाद्याशीं ) भांडणें ; झगडणें ; चकमक होणें ; खेटणें ; बरकशी लावणें ; स्पर्धा करणें . ३ घासाघीस करणें ; आग्रह ; अट , हट्ट धरणें ; ओढून धरणें . [ सं . घर्षण ; प्रा ; घासण ; हिं . घसना ; गु . घसवुं ; सिं . घशों ; फ्रें . खोस ] घासून घेणें - १ ( निराशेनें , संतापानें , निष्फळ झालेल्या मत्सरानें ) हात चोळणें , चुरमळणें ; चडफडणें . तूं आपल्या घरीं घासून घेतलेंस म्हणून त्याचा केंसही वांकडा होणार नाहीं . २ सोसणें ; सहन करणें ( नुकसान , दु : ख ). म्ह० घासून घ्यावें पण हांसून घेऊं नये = वेळ पडल्यास वाटेल ते नुकसान सोसावें पण लोक आपणास हंसतील , ठपका देतील असें करूं नये .
-
v t To rub, scrub, scour. To discuss, agitate in argument. To suffer (loss, injury &c.).
-
घांसून घ्यावें पण हांसून घेऊ नये Suffer any things, but incur not public ridicule.
Site Search
Input language: