-
वि. १ चौदा . २ चौदावा . [ सं . ]
-
०भुवनें लोक - नपु . ७ लोक व ७ पाताळ मिळून १४ भुवनें , लोक ; भू :, भुवर ; स्वर , मह :, जन , तप , सत्य , हे सप्त लोक आणि अतळ , वितळ , सुतळ , रसातळ , महातळ , तळातळ , पाताळ , हीं सप्त पाताळें मिळून एकंदर चौदा भुवनें होतात . - एभा १३ . ६३० . तुजसाठीं जगजेठी भुवनें चतुर्दश शोधिलीं । - देप ७५
-
०विद्या स्त्री. चार वेद ( ऋग्वेद , यजुर्वेद , सामवेद , अथर्ववेद ), सहा शास्त्रें ( छंद , निरुक्त , व्याकरण , ज्योतिष , शिक्षा , कल्प ), न्याय , मीमांसा , पुराण , धर्म मिळून चौदा विद्या . [ सं . ]
-
०विद्याधाम वि. उत्तम विद्वान मनुष्य ; पंडित . [ सं . ] चतुर्दशांगलोह - पु . रास्ना , कापूर , तालीसपत्र , ब्राह्मी , शिलाजित , सुंठ , मिरीं , पिंपळी , हिरडा , बेहडा , आंवळकाठी , नागरमोथे वावडिंग व चित्रकमूळ हीं चौदा औषधें आणि लोहभस्म १४ भाग यांचें चूर्ण , तूप व मध ह्यांशीं द्यावें . हें क्षुधाकारक , बलवर्धक व पुष्टिकारक आहे . - योर १ . ५६७ .
Site Search
Input language: