-
वि. १ स्पष्ट ; साफ ; निर्भिड ; उघड ; निश्चित ; रोखठोक ; सरळ ; शुद्ध ; निर्भेळ ( मनुष्य , भाषण , वागणूक इ० ). - अफला ६० . २ वेगळा ; भिन्न ; निराळा ; दुसरा ; पृथक . ३ संबंधरहित . आमची जागा निखालस आहे . - क्रिवि . १ निश्चयपूर्वक ; स्पष्टरीतीने ; खात्रीने . शिवाजी निखालस आपले पदरींचा गेला . २ निक्षून , लाभलोभ , भीडभाड न धरितां . ३ निवळ ; केवळ ; पूर्णपणे ; शुद्धपणे ; निक्खळ . देशस्थ ब्राह्मण निखालस स्वराज्याभिष्ट वृद्धीस जिवाची तमा न धरितां झटले . - चित्रगुप्त १२३ . [ नि + अर . खालिस ] निखालसता , निखालसी - स्त्री . १ खात्री ; खचितपणा ; निश्चय ; ठामपणा . त्याचे येण्याची निखालसता कांही दिसत नाही . २ संशयनिवारण ; खारर्जमा . ३ शुद्धभाव ; स्नेह . हरतर्हा ; होऊन निखालसीचा प्रकार घडेल या अंदेशावर मी बोलतो . - पया २३६ .
-
०पत्र न. यजीदपत्र ; सोडचिठ्ठी . - रा २० . ४१९ .
-
a Plain, positive, blunt. Separate, distinct.
-
वि. उघड , दिलखुलास , धडधडीत , धादांत , निर्भीड , निर्भेळ , प्रांजळ , रोकठोक , शुद्ध , सरळ , स्पष्ट , साफ .
Site Search
Input language: