मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय सतरावा|
श्लोक ५१ वा

एकनाथी भागवत - श्लोक ५१ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


यदृच्छयोपपन्नेन शुक्लेनोपार्जितेन वा ।

धनेनापीडयन् भृत्यान् न्यायेनैवाऽहरेत् क्रतून् ॥५१॥

उदीमव्यापारे जोडिलें । का जें असत्प्रतिग्रहें आलें ।

नातरी परपीडा प्राप्त जाहलें । कां आडवूनि घेतलें जें द्रव्य ॥८६॥

द्रव्य देतां चरफडी । ते शिष्या घालून सांकडीं ।

ऐसा अर्थ जोडिला जोडी । ते अपरवडी द्रव्याची ॥८७॥

जें यदृच्छा सहज आलें । कां जें शुक्लवृत्तीं जोडिलें ।

जें सुखोपायें हाता आलें । तें द्रव्य विहिलें यज्ञार्थ ॥८८॥

पाडूनि कुटुंबासी लंघन । सर्व द्रव्य वेंचूनि जाण ।

करूं नये यज्ञाचरण । अधर्मपण तेणेंही ॥८९॥

कां जीविका जीवनवृत्ती । याग करूं नये निश्चितीं ।

लौकिकीं मुरवावया स्फीती । याग करिती ते मंद ॥४९०॥

न धरितां कर्माभिमान । शुद्ध द्रव्य जोडिल्या जाण ।

करावें यज्ञाचरण । हें स्वधर्मलक्षण गृहस्थाचें ॥९१॥

सांडूनिया विषयलिप्सा चित्तीं । त्यजूनि गृहाची गृहासक्ती ।

गृहस्थें धरावी निवृत्ती । हें स्वयें श्रीपति सांगत ॥९२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP