जग जायाचें असें हे समजा क्षणभंगुर काया । हरिभजनीं सावध असावें व्यर्थ रीती जासी वांया ॥धृ०
चौदा कल्प आयुष्य मार्कंडेय गौतम, वृण श्रीधरती । ते मानिती तसें पाहुनी तुमची आमची किती कीर्ती ॥
बकदालभ्य, रोमहर्ष, कपिलमुनीचे दिवस सरती । यासी जर असत्य म्हणाल ठिक लिखे महाभारती ॥
मान्य असंख्य वीर होऊनि गेले कविराया ॥१॥
रामाक्षरी सिध्दि आणावे शंकराने कंठी धरलें । विषाचें अमृत झालें प्रल्हादाचे हृदयीं ठरलें ॥
नक्र गजेंद्र नामी उरलें । पूर्वजन्मींचे पाप हरलें । वाल्मीकानें तप केलें ॥
रामनाम अक्षर धरलें । वेदवाणी कुंठित झाली जिव्हा शेषाची दो ठाया ॥२॥
परिक्षिती राजा हरिगर्भि असतां नावं ठेविलें परिक्षिती । सात दिवसांनी मोक्ष साधिलें अक्षय किमिया आली हाती ॥
सप्तऋषी वामदेव तरले नामें व्यास गुण गाती । तेंच नाम तुकयानें वाणीकरुन गाईलें त्रिजगतीं ।
हरिश्चंद्र, श्रियाळ तरला सत्त्वाची केली छाया ॥३॥
वस्ताद भीमराज म्हणे संताला रामनाम ज्याचे चित्ती । तयापाशी परब्रह्म राही असे वेद बोले श्रुती ॥
विवेकभाव धरुनशेनी नित्य भजावें ब्रह्मपती । दत्तसावताळी प्रसन्न वडगांव दक्षिणीं ऐका वस्ती ॥
गणपति कवि म्हणे नामें पातक जाईल खरें विलया ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP