पद ब्रह्म साधा पुरें करा ध्यानी आचर । ज्यांनी साधिले ब्रह्म त्याला म्हणावे विप्र ॥ध्रु०॥
अंतरध्यानी कशि संध्या करावी सांगणे प्रकार । घाटि पळी पंचपात्र संध्या नैवेद्य आचार ॥
आणूरं वोचची घाटि उन्मनीचि पळी घर । शांति पयेची पुष्प संग जाणती अंतर । ब्रह्म० ॥१॥
प्रेमाचा कापुर धूप दीप अविनाश समोर । भक्तीचे थाळी भावार्थ उदबत्तीची बहार ।
मनाचा नैवेद्य दाखविती संत सद्गुणी वीर । उन्मुनी निद्रा लावुनि वोळखिले कैलासपुर । ब्रह्म० ॥२॥
महावाक्य गायत्री समजा ओवीजाकार । अलक्ष योनी पवित्र घालावे प्रेम धागा दोर ॥
ओंकार शब्द जपून माळा घाला अंतर । जुन्या गांवी मुर्त ओळखून घ्या परमेश्वर । ब्रह्म० ॥३॥
अशा रीतीची पूजा करा होईल निराकार । महावीर सुज्ञात घंटा गर्जे निरंतर ।
दत्त सावतळ प्रसन्न गुरु भीमराव सांगे शास्त्र । गणपत आत्मज्ञानी कवीश्वर नित्य सांगे विचार । ब्रह्म० ॥४॥

साकी
ब्रह्म राहिलें एकीकडे भलतीकडे भटकत फिरती । गुरुवांचुनी न पडे ठावें आत्मज्ञान प्रचिती ॥धृ०॥
दृष्टी उलटी करुनि कसोटी औटपीठ गोलहाट वरती । डोळ्यांचा डोळा उघडून पाहावे अंत:करणी ऐशी धरती ॥
ब्रह्मेद्रांतून वर दिसली अविनाश अमळमूर्ती । केला पातकाचा निर्वेश रुप पाहतां शरतारारती ॥
जीव देव एकरुपी झाले मग मागे काय ना उरती । कवि गणपत आत्मज्ञानीची दूरवर अशी कीर्ती । ब्रह्म० ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP