मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
स्वाध्यायाने

भावगंगा - स्वाध्यायाने

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


स्वाध्यायाने जीवन-ज्योती स्वयंप्रकाशित होते रे
जीव, जगत्‌, जगदीश, सकलही लीला-लाघव कळते रे
ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माउली ॥धृ॥
दंभ दूर पळतो अन्‌ जडते ध्येयावरती प्रीती रे
राग, द्वेष पळतात मनातुन दृष्टि विधायक येते रे
वृथाभिमाना थारा नाही, लाचारीला जागा रे
तेज लाभते शान्ताकारी प्रभुमय जीवन बनतरे रे.
ज्ञानेश्वर माउली तुकाराम ज्ञानेश्वर माउली ॥१॥
एकान्तातिल नीरव भक्ती कर्मयोग झणि होते रे
पूजा-पाठ नि ध्यान-योगही मर्म मोकळे करतो रे
आत्मनिरीक्षण सहज साधते परकी परनिंदाही रे
विकसन पद पद पुढे लाभते मार्ग दूरचा गमतो रे
ज्ञानेश्वर माउली तुकाराम ज्ञानेश्वर माउली ॥२॥
सुख न फुगविते अभिमानाला दु:ख, निराशा टळते रे
सुख-दु:खामधि रमते समता सम्यक्‌ दृष्टी वसते रे
भोगाची आसक्ती विरमते त्यागातिल नीरवता रे
त्याग-भोग-मीलन नित होते मंत्र श्रुतीचा कळतो रे
ज्ञानेश्वर माउली तुकाराम ज्ञानेश्वर माउली ॥३॥
उन्नत आशावाद भासतो पर्णहीन निराशा रे
जिवंत जीवन मंगल बनते मृत्यूचे भय टळतो रे
भगवत्‌ साक्षात्कार लाभतो कणकण प्रभुमय गमतो रे
दिव्य ज्योतिला दिव्य भेटते पूर्ण पूर्णिमा रंगते रे
ज्ञानेश्वर माउली तुकाराम ज्ञानेश्वर माउली ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 07, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP