मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
जीवन रंगवून घे स्वाध्याय-रंगात

भावगंगा - जीवन रंगवून घे स्वाध्याय-रंगात

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


जीवन रंगवून घे स्वाध्याय - रंगात
मन-बुद्धि दिव्य बनते स्वाध्याय-रंगात ॥धृ॥
अस्मिता फुलून उठे भावाला पान फुटे
तन- मन- स्वास्थ्य लाभते स्वाध्याय रंगात ॥१॥
तेज भरे जीवनात लाचारी उडुन जात
भगवंत पद लाभते स्वाध्याय-रंगात ॥२॥
गीतेचे गान होई संस्कृतिची जाण येई
कृष्णाचे काम घडते स्वाध्याय-रंगात ॥३॥
या इथेच अभय मिळे वृद्धकाळ भिउनि पळे
अमरत्व, सुख नांदते स्वाध्याय-रंगात ॥४॥
दानवता मिटुन जाई मानवता सजुन येई
माधवाचे प्रेम लाभते स्वाध्याय-रंगात ॥५॥
पांडुरंग-संग जडे मिळतिल स्वाध्याय-धडे
पक्व रंगीं मन बुडते स्वाध्याय-रंगात ॥६॥
दादांचा संदेश जपा योगेश्वर करिल कृपा
भव्य, धन्य जीवन लाभते स्वाध्याय- रंगात ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 01, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP