मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी|
अन्य नको वरदान

श्री स्वामी समर्थ - अन्य नको वरदान

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !


अन्य  नको वरदान
समर्था, अन्य नको वरदान !

दिशाहीन हे माझे तारू
सांग तया मी कसा सावरू
जीवनसागर पार हा करू
देई मज अवसान
समर्था, अन्य नको वरदान !

दिन जनांच्या सेवेसाठी
चंदनापुरी झिजण्यासाठी
ध्येय एवढे असु दे गाठी
द्या सामर्थ्य निदान
समर्था, अन्य नको वरदान !

संत संगती मज लाभावी
साधुजनांची सेवा व्हावी
विकारवशात दूर सरावी
मी व्हावे बलवान
समर्था, अन्य नको वरदान !

परस्परांची एकच नाती
भेदभाव का उगा ग्रासती
मी त्यांचा, ते माझे असती
इतुके द्या अवधान
समर्था, अन्य नको वरदान !

अहंकार मद जळून जावा
श्रध्देचा मनि दीप जळावा
कृपालोभ तुमचा लाभावा
द्या मजला हे दान
समर्था, अन्य नको वरदान !

N/A

References : N/A
Last Updated : May 25, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP