मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी|
दयासागर

श्री स्वामी समर्थ - दयासागर

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !


स्वामी दयेचे सागर हो
अवधूतच्या नाम कीर्तनी
तल्लिन मन हे झाले हो

नित्य तायाची गाता गाणी
मन स्थिर होते समर्थ चरणी
मम मानसमांदिरी गुरूचे
रूप गोजिरे ठसले हो
स्वामी दयेचे सागर हो

औदुंबरि, वाडीस, पहिला
गाणगापुरी त्यास पुजिला
अक्कलकोटी समर्थ रुपे
तोच दिगंबर रमला
स्वामी दयेचे सागर हो

रुदयी अमुच्या वसे नरहरी
भक्तिसुधेचा दीप अंतरी
गुरुचरित्र हे गाता गाता
जीवन सुखमय झाले हो
स्वामी दयेचे सागर हो

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP