विषयसापेक्ष कविता - साधना

गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.


संकल्पांसीं तडीस न्यायां, वनवांसी झाले ।
खडकराशि भेदोनि टाकित, निर्झर पाझरले ।
हिंस्त्र पशू, वनराज श्वापदे, सर्प, जेथ वसती ।
निबिड वनांतील, त्याच परिसरीं, निर्मित ही क्रांती ।
साधु कलंदर वृत्ति, तयाची किमया ही सारी ।
सामर्थ्याचें तुफान वादळ उसळत ते शरिरीं ।
विश्व निर्मिले अद्भुत, तेथें हरित भूमि वसली ।
अपंगासि आणुनि आश्रमीं, `माणुसकी' दिसली ।
परिचारक वैद्यकीय सेवा, प्रेमभाव सारे ।
उचलुनियां `माणूस' त्यातलां, कार्यी रत केले ।
निर्जन वन जे एकेकाळीं, विजनवास जेथें ।
साम्ययोग कृतिमधें खरा, संसार न दोघांचा ।
माणुसकीचा अथांग सागर, सागर प्रेमाचा ।
एकामागुनि एक समस्या, कितीक त्यां येती ।
बाबांची `साधना' प्रश्न ते, उकलुनि, सोडविती ।
वैयक्तिक स्वार्थासि न थारा, फक्त `ध्येय' पुढतीं ।
अंतर्मुख होवोनि लाभते, `ही' जीवनदृष्टी' ।
स्वाभिमान, जीवनी, समाजीं, अपंग ना आतां ।
आनंदवनीं, कार्योत्पादनि `उद्यम' ही गाथा ।
बिरुदावलि ना संतपणाची, हाच ध्यास `योजना' ।
शिखर ध्येय स्फुर्तीचे बाबा, हीच एक `साधना' ।
सोमनाथचा योगी, त्याची कर्मयोगि `साधना' ।
माणुसकीचा गहिवर `गोकुळ' कृष्णरुप कामना ।

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP