विषयसापेक्ष कविता - नव-कविता

गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.


ढाळू नको अश्रू सखे, कविते न तू `ती' राहिली ।
बदले जमाना हा नवा, आधुनिक लाट नवी आलीं ।
मी पाहिले पूर्वी तुला, शृंगार-भाव, स्वरांसवे ।
`मंदारमाला' इन्द्रवज्रा, तिलकावसंत पदां सवे ।
लालित्य निर्झर स्फुर्तिचा, उपमा पहावी, दर्पणीं ।
झंकार, नुपुरांचां जिथें, शब्दार्थ तबकीं अर्पुनी ।
संस्कृती शब्दांत वा चालीत `तन्वी' जाणिले ।
स्वरसाधना, ब्रह्मांड शब्दांचे, तसे मी ऐकिले ।
पंडित वामन, पंत ते, सुत-केशवाचा, बी मती ।
यशवंत, माधव, शतमुखीं ओळी तयांच्या घोळतीं ।
कविता न `ती' उरे, गद्यांत शब्द विसावले ।
ना वृत्त, यमकी शृखंला, शब्दांतले स्वर लोपले ।
गद्यात वाचित करोनीं, शब्दांत सांगावी' अता ।
प्रतिभा सुसाट्यानेच ये, करणी कशाला लावतां ?
गद्यओळी नवकवी `वाचेल' ते ऐकाल ना ? ।
कानांवरीं सहजी पडे, वचन ते अठवाल नां ? ।
ऐकतां क्षणिं ठाव घे, ते शब्द गद्याचे, मुखीं ।
सहज ये, तो श्रोत ओष्ठीं, ऐकण्यां मिळणार कां ?

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP