भक्तिगीते - भावार्थ (ज्ञानेश्वरी )

गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.


संतश्रेष्ठ हा ज्ञानी, आत्मानुभवी, निवृत्तिनाथ गुरु ।
नाथपंथ दीक्षेला, सद्गुरु निवृत्ति यांसि, कल्पतरु ॥
भांडार ज्ञानरुपी, कलेश पुरेपूर, संस्कृतात भला ।
तो प्राकृतात आणुनि, सामान्य जनापुढें खुला केला ॥
तात्विक, आध्यात्मिकही, वैचारिक पारमार्थिकां गणिले ।
जे ग्रथित संस्कृतामधि, लोकोध्दारासि जानपदिं लिहिले ॥
जीवन व्यवहारासीं, सामान्यजनां, जशीच शिस्त हवी ।
जाणुनिया, श्री भगवद गीता ग्रंथाचि निवड ती बरवी ॥
ज्ञान तसा, व्यवहारी, दोन्ही समृध्द पातळीं, जीवा ।
आदर्श ग्रंथ गीता, गौरवि, उद्दिष्ट जो मनीं ठेवा ॥
जिंकेल अमृताला, गोड मर्‍हाटाचि बोल ते खासे ।
विश्वासपूर्ण ऐशां, बोलति शब्दांत आत्मविश्वासें ॥
सिध्दांत कठिण निरुपणीं, त्याचे चौरस निरीक्षणीं, उकले ।
प्रज्ञा, प्रतिभा योगें, उभय गुणें, उकलुनी, प्रमेय खुले ॥
ऐशी कवित्व वाणी, रसिकपणें, स्पर्शुनी, परातत्वां ।
उधळण श्लेश हि उपमा, करण्यां स्पष्टार्थ, परातत्वां ।
उधळण श्लेश हि उपमा, करण्यां स्पष्टार्थ, त्यांतुनी भावा ॥
प्रज्ञावंत अनुभवी, व्यवहारी जाण, ज्ञात आध्यात्मीं ।
हे आत्मसात करुनी, लौकि जीवनि न ये मुळीं कामीं ॥
या पूर्ण जाणिवेनें, कष्टप्रद जीवनीहि लोकांना ।
पेलू शकेल आचरणीं, मार्ग शक्तिचा, जनांस दावियला ।
ज्ञानमार्ग त्यां मधुनी, सहजपणें अंतरांत भिडवियला ॥
देह असे जो वरती, सकलेंद्रिय असति कार्यिरत, तैशी ।
निष्काम कर्म, श्रध्दा, रहित फलाशा, जगास उपदेशीं ॥
प्राकृत भाषे करवीं, ज्ञानकर्म, भक्तिमार्ग, एक खरा ।
जीवनव्यवहार तसा, या मार्गा, अनुसरोनि उध्दारा ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP