मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|पुरंदरायण|
निंदक असावे

पुरंदरायण - निंदक असावे

कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..


निंदक असावे देवा जगी निंदक असावे
ग्राम करी निर्मळ, सूकर ते बरवे म्हणावे ॥ध्रृ॥
आमुच्या कर्माचे ते पापरुपी मल निंदक खाती
दुर्जन दांभिक परी वर वर करिती स्तुती
परी हेच जन अंतरी देवा का रे जळताती
भले निंदक ते, ऐसा दांभिकासी काय म्हणावे
निंदक असावे देवा जगी निंदक असावे
ग्राम करी निर्मळ, सूकर ते बरवे म्हणावे ॥१॥
जगतामाजी असता देवा, दांभिक दुर्जन
सज्जनासी लाभे कीर्ती, जगती मानसन्मान  
निंदक असावे चिरकाल सुकर समान
पुरंदर विठ्ठला,मनोरथ पूर्ण करावे
निंदक असावे देवा जगी निंदक असावे
ग्राम करी निर्मळ, सूकर ते बरवे म्हणावे ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP