मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|पुरंदरायण|
देव माझा आला

पुरंदरायण - देव माझा आला

कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..


देव आला माझा, स्वामी आला हो
देवाधिदेव दयानिधि आला हो
देव आला माझा ॥धृ०॥
शेषशयन आला, गरुडवाहन आला
पार्थसारथी नारायण आला हो
देव आला माझा ॥१॥
हा गिरीधारी आला, हा मनोहारी आला
वृंदावनपति गोविंद आला हो
देव आला माझा ॥२॥
हा गदाधर आला, हा चक्रधारी आला
अनाथांच नाथ, त्रिविक्रम आला हो
देव आला माझा ॥३॥
पक्षीवाहन आला, लक्ष्मण अनुज आला
अक्षयफल, श्री लक्ष्मीरमण आला हो
देव आला माझा ॥४॥
निगमगोचर आला, नित्य तृप्त आला
भक्तवत्सल पुरंदरविठ्ठल आला हो
देव आला माझा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP