मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान|
"दक्ष मी राहिलो तूझीये कार्यात"

सप्ताह अनुष्ठान - "दक्ष मी राहिलो तूझीये कार्यात"

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


तुझ्या प्राप्तिस्तव तूझ्या प्रीतिस्तव । त्यागिले मी सर्व कृपाळूवा ॥१॥
संसाराची चिन्ता अणुही न केली । महती मानिली तूझीच की ॥२॥
तूझ्यासाठी शत्रु मित्र मी जोडिले । संकटी पाडिले आपणांसी ॥३॥
तुझ्यासाठी नाही केला मी विचार । दु:खाचा साचार प्रभु दत्ता ॥४॥
रोग भोग सारे साहिले अनंत । तुज भगवंता सेवियेले ॥५॥
काहीं तरी नाथा काढोनी कारण । सेवा समर्पण तुज केली ॥६॥
दक्ष मी राहिलो तुझीये कार्यात । म्हणोनि संसारांत नसे लक्ष ॥७॥
म्हणोनि आतां ऐसा प्रसंग पातला । घात होय भला सर्वस्वाचा ॥८॥
नाही परमार्थ न साधिला संसार । ऐसा हा प्रकार प्राप्त झाला ॥९॥
करुणाघन प्रभो वळसी करुणेने । ऐसे मी वाचेने वदतसे ॥१०॥
माझिया देहाचा नाही भरंवसा । ह्रदयनिवासा जाणतोसी ॥११॥
आपुल्या स्थानाचा न केला विचार । तुम्ही गुरुवर अद्यापिही ॥१२॥
नैराश्याचा मज झटका बसत । तेणे विह्वळत गुरुराया ॥१३॥
माझे दैन्य दूर कोण तो करील । तुजवीण धांवेल कोण सांग ॥१४॥
विनायक म्हणे जाणसी अंतरीचे । सांगू काय वाचे बोलोनियां ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP