मालिका १४ चतुर्दशी

श्री गणपती महाराज केरूरकर ह्यांचे लिखाण म्हणजे कस्तुरीचा वास शपथपूर्वक सांगणे.


॥ जय जय राम कृष्ण हरि । जय जय राम कृष्ण हरि ॥
(॥ रुप पाहातां लोचनी॥  आणि ॥ राहोआतां हेचि ध्यान ॥)

अभंग -१
श्रीज्ञानेश्वर महाराज वाक्य--
संपत्ति विपत्ति दु:ख ॥ हरेल अवघा शोक ॥ वेगीं करुनिया विवेक ॥ हरिस्मरणें करी ॥१॥
मंत्र यंत्र सूत्रधारी ॥ सिध्द साध्य तोचि हरि ॥ नित्य जपोनि वैखरी ॥ आप्ततां करी हरीसी ॥धृ०॥
ध्यान मन एकचित्त ॥ अलक्ष लक्षी अव्यक्त ॥ न सांगे शिताची मात ॥ अखंड जपे हरिनाम ॥२॥
ज्ञानदेवें जप केला ॥ मग समाधी बैसला ॥ नामा घेतां बोध जाला ॥ देव आला ह्र्दयासी ॥३॥ ॥धृ०॥

अभंग -२
श्री नामदेव महाराज वाक्य--
काय थोरपण मिरविसी व्यर्थ ॥ खोटेंपण स्वार्थ कळो आलें ॥१॥
हिता अनहिता केले आपस्वर्थ ॥ वचन यथार्थ बोल आतां ॥२॥
होसी कलिमाजीं कलिसारिखाची ॥ भोळ्या भाविकासी भक्ति काजा ॥३॥
नामा ह्मणे माळ घालीसी स्वहस्ते ॥ करीतोसि दंडवत निर्मात्यासी ॥४॥

अभंग -३
श्री नामदेव महाराज वाक्य--
मरणें पेरणें जन्म उगवणें ॥ मायेची ती खूण सांगितली ॥१॥
संग तुझा पुरे संग तुझा पुरे ॥ संग तुझा पुरे नारायणा ॥२॥
तूं तरी न मरे मी तरी न पुरे भक्ती हें संचरे हचि लाभु ॥३॥
नामा ह्मणे माझ्या ठायींचा मी नेणें ॥ संसार भोगणे तुझी लाज ॥४॥ ॥धृ०॥

अभंग -४
श्री नामदेव महाराज वाक्य--
स्फुंदस्फुंदोन नामा उभा महाद्वारी ॥ चित्त पायावरी विठोबाच्या ॥१॥
उभा दीनानाथ उभारुनी बाहे ॥ पालवीत आहे पीतांबरें ॥२॥
आरता येरें नामया धरिला पोटासी ॥ कोणें गांजिलासी दुर्जनानें ॥३॥
अंतरीचें सांगे पडे माझ्या मागे ॥ कांरिसी उद्वेग संसारीचे ॥४॥
नामा ह्मणे विठोबा आसे मी नेणता ॥ आठवी पंढरीनाथा वेळो वेळा ॥५॥

अभंग -५
श्री नामदेव महाराज वाक्य--
भूमि लोळे नामा कंठ सद्गदित ॥ डोळया स्त्रवत अश्रुजळ ॥१॥
इतुकें दोखोनियां द्र्वला पुरुषोत्तम ॥ नाम्यासी सप्रेमे उचलिलें ॥२॥
नाम्या तुज काय वाटतसे दु:ख संसाराचा शोक तुज झाला ॥३॥
नामा ह्मणे देवा तुज ऐसा दाता ॥ मज भवव्यथा कवणेपरी ॥४॥ ॥धृ०॥

अभंग -६
श्री नामदेव महाराज वाक्य--
त्वरें धांवोनिया आलासे गोविंद ॥ सावधा सावध नाम देवा ॥१॥
रुसलासे नामा देवासी न बोले ॥ कारें कुर्वाळिलें वदन त्याचें ॥२॥
समजावुनी नामा धरिलासे पोटासी ॥ बोले मजपाशी नामदेवा ॥३॥
नामा ह्मणे देवा उशीर कां केला ॥ किंवा माझा आला तुला राग ॥४॥
मागें बहुतांनीं वर्णिलें प्रबंध ॥ पाहुनी म्यां तुझा संबंध वेडावलो ॥५॥
ऐसें बोलूनिया माथा ठेवी चरणीं ॥ प्रताप ते नामदेवा ॥६॥ ॥धृ०॥

अभंग -७
श्री नामदेव महाराज वाक्य--
परियेसी नाम्या सांगतो मी तुज ॥ अंतरीचे गुज भक्तराया ॥१॥
तूं माझ आवडते कृपेचे पोसणें ॥ चित्ताचें बसणें करीन तुज ॥२॥
येणें संतसंगे यावें माझ्या गांवा ॥ भोगावें राहणिवा वैकुंठीच्या ॥३॥
माझीया कथेची ज्या बहु आवडी ॥ माझी प्रेम गोडी पढीये जया ॥४॥
त्याची पायधुळी लागांवी सर्वागें ॥ ह्मणोनी मागे मागें हिंडतसें ॥५॥
भक्त त्या यातीचे भलतेनी भावे ॥ भलते एक घ्यावें नाम माझें ॥६॥
त्यांची या उपकारें दाटे मी सर्वथा ॥ मुगुट करुनी माथां वाहीन त्यासी ॥७॥
तनुमन प्राण दिधले जेणे मातें ॥ मजहुनी पढीयते नाहीं त्यासी ॥८॥
चिंता न करी नाम्या नुपक्षी सर्वथा ॥ अभय करु माथा ठेविला देवे ॥९॥

अभंग -८
श्रीएकनाथ महाराज वाक्य--
जें सुख संत सज्जनाचे पायी ॥ तें सुख नाहीं आणिके ठाय़ीम ॥१॥
तुकितां या सुखचेनि तुकें ॥ वैकुंठही होय फिके  ॥धृ०॥
पाहूं जातां लोकी तिन्ही ॥ ऐसें न दिसें आणिकें ठायी ॥२॥
नवल या सुखाची गोडी ॥ हरिहर ब्रह्मा घालिती उडी ॥३॥
क्षीरसागर सांडोनि पायीं ॥ अंगे धांवे शेषशायी ॥४॥
एका जनार्दनी झाली भेटी ॥ सुख संतोषा पडली मिठी ॥५॥ ॥धृ०॥

अभंग -९
श्रीएकनाथ महाराज वाक्य--
देवपण मज आणियेले जेही ॥ त्याचिया उपकारा नव्हे उतराई ॥१॥
भक्ताचे उपकार कैसेनि फेडी ॥ यालागी त्याचि उच्चिष्टें काढी ॥२॥
भक्ताचेनि पालटे येतो गर्भवासा ॥ उपकारा उतराई तरी नव्हे कैंसा ॥३॥
एका जनार्दनी उतराई नव्हे ॥ यालागी भक्तात न विसंबे जीवें भावें ॥४॥ ॥धृ०॥

अभंग -१०
श्री तुकाराम महाराज वाक्य--
बोल नाहीं तुझ्या दातृत्वपणासी ॥ आम्ही अविश्वासी सर्व भावें ॥१॥
दंभे करी भक्ती सोंग दावी जना ॥ अंतरी भावना वेगळीया ॥२॥
चित्ता तूं रे साक्षी तुजकळे सर्व ॥ किती करु गर्व आतां पुढें ॥३॥
तुका ह्मणे देवा तु काय करीसी ॥ कर्मा दुस्तरासी आमुचीया ॥४॥ ॥धृ०॥

अभंग -११
श्री तुकाराम महाराज वाक्य--
समर्थासी लाज आपुल्या नामाची शरण आल्याची लागे चिंता ॥१॥
न पाहे तयाचे गुण दोष अन्याय ॥ सुख देउनि साहे दु:ख त्याचें ॥२॥
मान भलेपण नाहीं फूकासाठा ॥ जयावरी गांठी झीज साहे ॥३॥
तुका ह्मणे हे तू सर्वही जाणसी ॥ मज अधीरासी धीर नाही ॥४॥ ॥धृ०॥

अभंग -१२
श्री तुकाराम महाराज वाक्य--
फिरविलें देऊळ जगामाजी ख्याती ॥ नामदेवा हाती दुध प्याला ॥१॥
भरियेली हुंडी नरसी मेहेत्याची ॥ धनाजी जाटाची शेतें पेरी ॥२॥
मिराबाईसाठीं घेतो विषप्याला ॥ सामाजीचा झाला पाडेवार ॥३॥
कबीराचे मागीं विणूं लागे सेले ॥ उठविलें मूल कुंभाराचें ॥४॥
आतां तुह्मी दया करा पंढरिराया ॥ तुका विनवी पायां वेळोवेळां ॥५॥ ॥धृ०॥

अभंग -१३
श्री तुकाराम महाराज वाक्य--
तुज पाहातां समोरी ॥ दृष्ती न फिरे माघारी ॥१॥
माझें चित्त तुझ्या पायां ॥ मिठी पडली पंढरीराया ॥२॥
नव्हें सरितां निराळें ॥ लवण मेळवितां जळें ॥३॥
तुका ह्मणे बळी ॥ जीव दिला पायांतली ॥४॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०अ९ -- पैं सर्वभावएसी उखिते ॥ वोपिले मज चित्तें ॥ जैसा गर्भगोळ उद्यमातें ॥ कोण्यही नेणें ॥३३५॥
एसे अनन्यगताकें चित्तें ॥ चिंतितसाते मातें ॥ जे उपासिता तयातें ॥ मीचि सेवी ॥३३७॥

अभंग -१४
श्री तुकाराम महाराज वाक्य--
भक्ताहुनि देवा आवडातें काई ॥ त्रिभुवनी नाहीं आनदुजे ॥१॥
नावडे वैकुंठ क्षीराचा सागर ॥ धरोनि अतर राहे दासा ॥२॥
सर्व भावे त्याचे सर्वस्वेही गोड ॥ तुळसीदळ कोड करुनी घ्यावें ॥३॥
सर्वस्वें त्याचा ह्मणवी विकीला ॥ चित्त द्यावें बोला सांगितल्या ॥४॥
तुका ह्मणे भक्तीसुखाचा बांधिला ॥ आणीक विठठला धर्म नाही ॥५॥ ॥धृ०॥
भजन
श्रीज्ञानदेवतुकाराम । श्रीज्ञानदेवतुकाराम ॥धृ०॥
आरत्या ---१  झाले समाधान । तुमचे देखि० २
करुन आरती । चक्र पाणी ओवाळी०  ३
प्रेम सप्रेम आरती ॥ गोविंदासि ओ० ४ आरती ज्ञानराज । महाकै० ॥धृ०॥
भजन ---
घालिन लोटांगण । वंदीन चरण । श्रीविठठल रखुमाई । विठोबा रखुमाई ॥धृ०॥
अभंग नाचाचे ----मागणे हे एक तुजप्रती ।
भजन----ज्ञानदेव तुकाराम । ज्ञानदेव तुकाराम
प्रसाद ----पाहे प्रसादाची वाट । पावला प्रसाद आतां वि० ॥
शेजाआरती ---१ शब्दाचिया रत्ने करुन अलंकार
२. चंदनाची ओवरी । आड केले देवद्वार ॥
पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम  

N/A

References : N/A
Last Updated : December 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP