मालिका १३ त्रयोदशी

श्री गणपती महाराज केरूरकर ह्यांचे लिखाण म्हणजे कस्तुरीचा वास शपथपूर्वक सांगणे.


॥ जय जय राम कृष्ण हरि । जय जय राम कृष्ण हरि ॥
(॥ रुप पाहातां लोचनी॥ आणि ॥ राहोआतां हेचि ध्यान ॥)

अभंग -१
श्रीज्ञानदेव वाक्य--
समाधीचें साधन ॥ तें नामराम चिंतन ॥ चित्ता सुख संपन्न ॥ हर्ष जीवनी केला ॥१॥
कोटि तपाचिया राशी ॥ जोडती रामनामा पाशीं ॥ नाम जपतां अहर्निशी ॥ वैकुंठपदवीं पाविजे ॥धृ०॥
हेचि धुरुसी आठवले ॥ उपमन्यें हेंचि घोकिले ॥ अंबऋषीने सांधिले ॥ रामकृष्ण उच्चारुनी ॥२॥
पांडवांशी सदाकाळीं ॥ कृष्ण राहिला जवळी ज्ञान देव ह्र्दयी कमळीं ॥ तैसाचि स्थिरावला ॥३॥

अभंग -२
श्रीज्ञानदेव वाक्य--
आदि मध्य अंत सर्व सम हरि ॥ घट मठ चारई भरला दिसे ॥१॥
देखिला गे माये अलक्ष लक्षितां ॥ शांतिपक्ष वाता समबुध्दि ॥धृ०॥
भाव बळ धन अलोट अभंग ॥ चित्संगे भंग प्रपंचाचा ॥२॥
ज्ञानदेव बोले नित्य नाम प्रेम ॥ तेथेंची विश्राम हरिचा असे ॥३॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२ -- कृतनिश्चयेसी बुध्दी ॥ होऊनि ठाके समाधी ॥ ऐसी देखोनि ह्र्दयशुध्दी तेथोनि त्रिशुध्दी न निघे हरि ॥७७०॥

अभंग -३
श्रीज्ञानदेव वाक्य--
यमधर्म सांगे दूतां ॥ तुह्मी परिसावी निज कथा ॥ जेथें रामनाम वार्ता ॥ तया देशा नवजावें ॥१॥
नामे महादोषां हरण ॥ नामे पतित पावन ॥ नामें कलिमदहन ॥ भवबंधनमोचक ॥धृ०॥
जये देशी नाम वसे ॥ नाम श्रवणी विश्वासे ॥ गाती नाचती उल्हासे ॥ झणी पहाल तयांकडे ॥२॥
जये ग्रामी हरिपूजन ॥ जये नगरीं हरिकीर्तन ॥ तेथें गेलिया बंधन ॥ तुह्मीं पावाल त्रिशुध्दी ॥३॥
जयेदेशी गरुडटका ॥ कुंचे ध्वज आणि पताका ॥ जेथें संतजन आईका ॥ तया देशा नवजावें ॥४॥
आणि एक ऐका रे विचारुं जेथें रामनामाचा गजरु ॥ तेथें बापरखुमादेविवरु तया बळे नागाती ॥५॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२ -- यम नियमा पडती उपवास ॥ मरो टेकले योगाभ्यास ॥ कीर्तन गजरे ह्र्षीकेश ॥ निर्दाळी दोष नाममात्रे ॥५३२॥

अभंग -४
श्रीज्ञानदेव महाराज वाक्य--
समाधि साधन संजीवन नाम ॥ शांति दया सम सर्वाभूति ॥१॥
शांतीची पैं शांति निवृत्ती दातारु ॥ हरिनाम उच्चारु दिधला तेणी ॥धृ०॥
शम दम कळा विज्ञान सज्ञान ॥ परतोनि अज्ञान न ये घरा ॥२॥
ज्ञानदेवा सिध्दि साधन अवीट ॥ भक्तिमार्ग निट हरिपंथा ॥३॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२६ -- निरपेक्ष तो मुख्य भक्त ॥ निरपेक्ष तो अति विरक्त ॥ निरपेक्ष तो नित्य मुक्त ॥ सत्य भगवंत निरपेक्षी ॥७३५॥
चहु पुरुषार्थाचे अधिष्ठान ॥ नरदेह परमपावन ॥ जेणें देहे करितां भजन ॥ ब्रह्म सनातन पाविजे ॥१५९॥

अभंग -५
श्री नामदेव महाराज वाक्य--
काळ वेळ नसे नामसंकीर्तनी ॥ उंच नीच योनी हेंही नसे ॥१॥
धरा नाम कंठी सदा सर्वकाळ ॥ मग तो गोपाळ सांभाळील ॥२॥
कृपाळु कोंवसा सुखाचा सागर ॥ करील उध्दार भाविकांसी ॥३॥
नामा म्हणीं फार सोपे हे साधन ॥ वाचे नाम घेणें इतुकेची ॥४॥ ॥धृ०॥
तुझे नामाचें प्रबळ ॥ माठा नुठविती कळिकाळ । चारी मुक्तिकेवळ ॥ होतो निश्चळ निजदासी ॥५॥

अभंग -६
श्रीएकनाथ महाराज वाक्य--
अखंड वाचें नाम ॥ तया न बाधी क्रोध काम ॥१॥
रामनाम वदतां वाचें ॥ ब्रह्मसुख तेथें नाचें ॥२॥
रामनामें वाजे टाळी ॥ महादोषा होय होळी ॥३॥
दो अक्षरांसाठीं ॥ ब्रह्मा लागे पाटोवाटी ॥४॥
ज्ञा०अ०९ -- यम ह्मणे काय यमावें ॥ दम ह्मणे कवणाते दमावें ॥ तीर्थे ह्मणती काय खावें ॥ दोष औषधासि नाही ॥१९९॥
ऐसे माझेनि नमघोषें ॥ नाहीचि करिती विश्वाची दु:खें ॥ अवघें जगचि महासुखें ॥ दुमदुमित भरलें ॥२००॥

अभंग -७
श्रीएकनाथ महाराज वाक्य--
ध्यानी बैसोनि शंकर ॥ जपे रामनाम सागर ॥१॥
पार्वती पुसे आवडी ॥ काय जपतां तांतडी ॥२॥
मंत्र तो मज सांगा ॥ ऐसी बोलतसे दुर्गा ॥३॥
एकांती नेऊन ॥ उपदेशी राम अभिधान ॥४॥
तेंचि मच्छिंद्रा लाधलें ॥ पुढें परंपरा चालिलें ॥५॥
तोचि बोध जनार्दनी ॥ एका लागतसे चरणी ॥६॥॥धृ०॥
ज्ञा०अ०८ -- जें तनू वाचा चित्ते ॥ न ऐकती दुजिये गोष्टी ते ॥ तया एकनीष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे ॥१९२॥

अभंग -८
श्रीएकनाथ महाराज वाक्य--
रामनाम पावन ॥ या परतें थोर कोण ॥१॥
जड शिळा ते सागरीं ॥ नाम तरल्या निर्धारी ॥२॥
राम जप सदा ॥ नोहे काळाची ती बाधा ॥३॥
नाम घेतां निशीदिनीं एका शरण जनार्दनीं ॥४॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०८ -- ऐसे जे नित्ययुक्त ॥ तयांसि सुलभ मी सतत ॥ म्हणऊनि देहांती निश्चित ॥ मीचि होती ॥१४०॥

अभंग -९
श्री नामदेव महाराज वाक्य--
जळाचा जळबिंदु जळींच तो विरे ॥ तैसे हें विघरे पांचा ठायीं ॥१॥
जीव शिव हे उच्चार राम हे मधुर ॥ जिव्हेसी उच्चार रामनाम ॥२॥
रामनाम तारक शिव षडांक्षरी ॥ तैसी वाचा करी अरे मूढा ॥३॥
नामा ह्मणे ध्यान शिवाचे उत्तम ॥ मंत्र हा परम रामनाम ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२ -- कैलासराणा शूलपाणी ब्रह्मा लागे ज्याचे चरणी, तोहि निजराज्य सांडोनी, महात्मशांती हरिचरणां चिती ॥७४६॥
कौपीन भस्म जटाधारी चरणोदक धरोनि शिरीं ॥ हरि चरणा ह्र्दय माझारी ॥ शिव निरंतरी चिंतीत ॥७४७॥

अभंग -१०
श्री नामदेव महाराज वाक्य--
नामाचा प्रताप जाणवेना कोणा ॥ समुद्री पाषाण तारीयेले ॥१॥
आवडीने कोणी चिंतितां उल्हास ॥ काय तो तयास उपेक्षील ॥२॥
कुटिणी ते निच राव्यासाठी नेली ॥ वैकुंठीं ठेविली सारुध्यानें ॥३॥
अजमेळा खळ पुत्राचिया मिषें ॥ उध्दरीलें त्यास दिनानाथें ॥४॥
नामा ह्मणे ऐसें सांगो आतां किती ॥ नामापाशीं मुक्ती उभी असे ॥५॥

अभंग -११
श्री नामदेव महाराज वाक्य--
भक्त प्रल्हादाकारणें ॥ त्या वैकुंठीहुनी धांवणे ॥१॥
नरहरि पातला पतला ॥ महादोषा पळ सुटला ॥धृ०॥
शंख, चक्र, पद्म, गदा ॥ नाभी नाभीरे प्रल्हादा ॥२॥
दैतै धरी मांडीवरी ॥ नख विदारी नरहरि ॥३॥
पावला गरुडध्वज ॥ नामया स्वमी केशवराज ॥४॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०९ -- तो प्रल्हाद गा मजसाठी ॥ घेतां बहुतें सदा किरीटी ॥ कां जे मी यां द्यावें ते गोष्टी ॥ तयाचिया जोडे ॥४५१॥

अभंग -१२
श्री तुकाराम महाराज वाक्य--
पुराण प्रसिध्द सीमा ॥ नामतारक महिमा ॥१॥
महादोषा पुढें नाहीं गर्भवास ॥२॥
जें निंदिलें शास्त्रे वद्य झालें नामामात्रे ॥३॥
तुका ह्मणे ऐसा ॥ त्रिभुवनी नाम ठसा ॥४॥ ॥धृ०॥

अभंग -१३
श्री तुकाराम महाराज वाक्य--
तारिली बहुतें चुकवूनि घात ॥ नाम हे अमृत स्वीकारितां ॥१॥
नेणतां सायास शुध्द आचरण ॥ यातिकुळहीन नामासाठी ॥२॥
जन्म नांव धरी भक्तीच्या पाळणा ॥ आकार कारणा याचसाठी ॥३॥
आसुरी दाटली पाप होता फार ॥ मग फेडी भार पृथ्वीचा ॥४॥
तुका ह्मणे देव भक्तपण सार ॥ कवतुक वेव्हार तयासाठीं ॥५॥
ए०भा०अ०२ -- आत्मा परम प्रिये हरि ॥ ज्याचे नाम कीर्तीचा हर्ष भारी ॥ नीतनवी आवडी बरी । सबाह्याभ्यंतरी हरि प्रकटे ॥५५०॥

अभंग -१४
श्री तुकाराम महाराज वाक्य----
सर्व सुखा अधिकारी ॥ मुखें उच्चारी हरिनाम ॥१॥
सर्वांगें तो सर्वोत्तम ॥ मुखी नाम हरिचें ॥२॥
ऐसी उभारिली बाहे ॥ वेदीं पाहें पुराणीए ॥३॥
तुका ह्मणी येथें कांही संदेह नाही भरंवसा ॥४॥ ॥धृ०॥
भ०गीता०अ०७ -- बहुनां जन्मनामंते ज्ञानवान्मां प्रपद्यते ॥ वासुदेव:: सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ: ॥१९॥
ज्ञा०अ०७ -- हे समस्तही श्रीवासुदेव ॥ ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भाव ह्मणोनि भक्तामाजी राव ॥ आणि ज्ञानिया तोचि ॥१३६॥
 
अभंग -१५
श्री तुकाराम महाराज वाक्य--
तृषाकाळी उदकें भेटी ॥ पडे मिठी आवडीची ॥१॥
ऐसियाचा होकां संग ॥ जिवलग संतांचा ॥२॥
मिष्टान्नाचा योग भुके म्हणतां चुके पुरेसें ॥३॥
तुका ह्मणे ते वाळा ॥ कळवळा भेटीचा ॥४॥ ॥धृ०॥
भजन
श्रीज्ञानदेवतुकाराम । श्रीज्ञानदेवतुकाराम ॥धृ०॥
आरत्या ---१  झाले समाधान । तुमचे देखि० २
करुन आरती । चक्र पाणी ओवाळी०  ३
प्रेम सप्रेम आरती ॥ गोविंदासि ओ० ४ आरती ज्ञानराज । महाकै० ॥धृ०॥
भजन ---
घालिन लोटांगण । वंदीन चरण । श्रीविठठल रखुमाई । विठोबा रखुमाई ॥धृ०॥
अभंग नाचाचे ----मागणे हे एक तुजप्रती ।
भजन----ज्ञानदेव तुकाराम । ज्ञानदेव तुकाराम
प्रसाद ----पाहे प्रसादाची वाट । पावला प्रसाद आतां वि० ॥
शेजाआरती ---१ शब्दाचिया रत्ने करुन अलंकार
२. चंदनाची ओवरी । आड केले देवद्वार ॥
पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम  

N/A

References : N/A
Last Updated : December 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP