मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख ६९

शिवचरित्र - लेख ६९

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


श्री
श.१६०९ कार्तिक शु. ४
इ.१६८७ आक्टोबर ३०
[‘श्री मार्तंड भैरव । चरण राया । जी सदक प्राभु शरण’ असा पिंपळपानी शिक्का]
आरंभी
ई कौलनामे अज दिवाण मामले मुर्तजाबाद उरुफ चेऊल त॥ रयती मोख्तसर बागायेत म॥ अगर चेऊल सु॥ समान समानीन व अलफ कारणे दादे कौलनामा यैसाजे तुमचे बाबे देसमुख मामले मजकूर मालुम केले की सन सीतामधे गनीम राजपुरकर येऊन शाहार जाळहाल करुन गेले याकरिता रयेत कुल परागदा जाहाली शाहर दोन वरशे खराब पडिले वसाहत नाहीं तरी साहेबी रयेतीवर मेहरबानी करुन मकसूद मनास आणून मकसूदप्रमाणे कौल दिलीयानी रयेती शाहारामधे जाऊन वसाहत करील म्हणून मालुम केले त्यावरुन मकसूद मनास आणून मकसूदप्रमाणे कलमाचे कलम मनास आणून कौल दिधला असे कलमे बित॥
किता कलम सन सेतामधे राजपूरकर रयेती कुल परागदा जाहाली घरे व राहाट राहाटवड माड सुपारिया व बाजे झाडे खराब पडिली राजपुरकराचे धास्तीकरिता वसाहत नाही बागायेत कुल खाली जाहाले वसाहतेस जागा नाही तेण्हेकरुन चोरचिरटे व ज्याचे मनास येई तेण्हे बाजे झाडे व सुपारिया व जुजवी माड तोडून नेले व राहट राहटवड व घरे व देउले मोडून नेली यैसियास दुकालाकरिता व फितरतीकरिता काही रयेती मयेती जाहाली काही रयेती राहिली तरी साहेबी मेहरवान होऊन मामुरीवरी नजर देऊन आम्ही आपले जागेयास जाऊन खोपटे घालून वसाहत करुन काही माड राहिले आहेती त्यास कस्ट मशाखत सेणपाणी करुन तीन च्यार साला बगर कस्टास येतील तेव्हां हसिलास येतील यैसियास साहेब मेहरवान होऊन साल मजकुरी खराबेयाचे देणे घेतले आहे तितकीच बाकी राहिले आहे ते वसाहते बदल मामुरी माफ केले पाहिजे वसाहत करुन मामुरी होईल झाडास कस्ट होऊन बारास येतील तेव्हा पाहणी करुन जमाबदी केली पाहिजे तोवर बदल मामुरी माफ केले पाहिजे म्हणून तरी अजी त॥ वसूल जाला तो जाहाला बाकी उरला त्याची तसवीस लागणार नाही पेस्तर साली पाहणी करुन होईल बेरीज ते सालपावेतो वसूल घेऊन [नि] मोर्तब सुद किता कलम बागायेतामधे नागवेली कोण्ही करितील त्याची फर्मास हुजराती व सुभे व कुले व फूट हवाले व किलेयाची करिताती तरी सालाबाद रवेस आहे जरीबे पत्रकेणी त्यापासून फर्मास बरहक घेऊन त्याचे जरीबेयामधे मजुरा द्यावी येसी रयेस असोन रयेतीवर फर्मास येते तेण्हेकरुन मामुरी होत नाही कस्ट करुन चारे होताती तरी साहेब मेहरवान होऊन फर्मासेची तसवीस तुम्हास न लगे रास्ती पेके देऊन खरीदी करुन समाधान असो देणे [नि] मोर्तब सुद किता कलम पेसजी तह आहे की नारल दर सदे टके ५॥९ व सुपारी दर मणे टके ९ यैसा असौन हली अगर खराबा वसाहत नाही हसील नाही खराबा जाहाले येसे असोन हली सन सबा कारणे ज्याजती जलल किमती नारल दर सदे टके ६॥ व सुपारी दर मणे टके १०॥ तह करुन जमाबदी केले आहे सरकारकुनी पेसजी तह दिधला आहे तेण्हेप्रमाणे घेतली पाहिजे ज्याजती हली जलल आमचे सिरी होत आहे ते दूर केले पाहिजे म्हणून तर पेसजी तहप्रमाणे घेऊन जाजती तसवीस न लगे [नि.] मोर्तब सुद किता कलम अनाडी कुले असेल त्यास येक साल घरटका व मीठ माफ करणे व बेगारीची तसवीस न लगे ते दूर केली पाहिजे म्हणून तर मीठटका घेऊन घरटका व वेठेबगार याची तसवीस लागो देण्हार नाही येक साला माफ असे [नि] मोर्तब सुद किता कलम कोण्ही वाडियामधे नाचणी व हरक व वरई व उडीद व मूग व मेधल व वागी व आले व हलद व ऊस व ताग व तुरी व जोधले करील त्याची पाहाणी बदल मामुरी तसवीस दूर केली पाहिजे म्हणून तर मामुरा वाडियास तकादा न लागे आमानतास कीर्दी केलिया पाहाणी करुन घेऊन [नि.] मोर्तब सुद किता कलम वाडिया खराबा आहेती त्या कोण्हास इजारा लाविला तरी बरहक पाहाणी करुन च्यार पाच साले इस्तावा करुन देणे व बाजे झाडे बदल मामुरी हसील देणे त्यास कर्ज व बैल बदल मामुरी देणे म्हणून तरी खराबा वाडी असेल ते माहलीचे कारकुनाचे रुजुवातीने लावणे तह करितील तेण्हेप्रमाणे घेऊन [नि] मोर्तब सुद किता कल तपवासनिस हुजुरुन येताती दरम्याने कोण्ही चुगली करितो हर कोण्हास फितवा घालून त्यास मसाले करुन दस्त करुन आणिताती तरी साहेब आमचे सिरावरी हकीम असोन दरम्याने मनसुफी इनसाफ न करिता खड गुन्हेगारी घेताती हे साहेबास दखल नाही तरी जो कोण्ही साहेबी बगर रजाने आणिला त्याची इनसाफी साहेब व बरहक इनसाफ करुन ज्याचा गुन्हा असिला त्यास मवसर माफीक गुन्हेगारी घ्यावी ज्याचा गुन्हा नसला त्यास तसवीस व लवावे ये बाबे कौल सादर केला पाहिजे म्हणून तर सदरहु गोस्टीचा तह आम्ही व सरदेसमुख व देसमुख व मोख्तसर यैसे बैसोन बरहक मनसुफी करुन ज्याजती जलल करीत त्यास सजा पावेल जाणिजे [नि] मोर्तब सुद
किता कलम रयेती शाहारामधे वसाहत करील त्यास बदल मामुरी घरटका व मीठ माफ केला पाहिजे म्हणून तर घरटका माफ येकसाला करुन मीठ घेऊन जाणिजे [नि] मोर्तब सुद किता कलम किलेहाये व सुभेहाये व जुमलेहाये व पावलोक फुटहवाले व घोडा राऊत स्वारी करुन येताती ते रयेतीचे भात व बीज घरीहून व मार्गीहून व विलायेतीहून खाचपेमे लुटून नेताती येण्हेकरुन रयेतीचा हारास होतो इनसाफ होत नाही दिवाण बेरीज वसूल होता .......... लूट नागावा होतो [साहेब] आमचे सिरावरी असता जलल होते ते मेहरवान होऊन जललज्याजती दूर केले पाहिजे हिसेबी कुल हक वसूल घेणे ज्याजती तसवीस दूर करणे म्हणून तरी येकदर तसवीस लागो देण्हार नाही मनास आणून पारपत्ये करुन जाणिजे स्वारी सिकारी जे तर्फेस जे गावी होईल तेथे तसवीस लागो देणार नाही जाणिजे [नि] मोर्तब सुद किता कलम बदल मामुरी भडारी तूट मुदतीने माड रोजे करितील त्यास पेटवणी पधरा रोज रवेस आहे बदल मामुरी पेटवणी पधरा रोज देविले पाहिजे ये बाबे कौल देविला पाहिजे म्हणून तर सालाबाजप्रमाणे देऊन जाणिजे [नि] मोर्तब सुद

किता कलम राहट राहटवड व देरिया (?) व रुख कुल नेले त्यास जागा नाही व घरास जागा नाही मेहरवान होऊन कर्ज देविले पाहिजे व कोण्हास बैल नसला त्यास बैल पाहिजे तो मेहरवान होऊन देविला पाहिजे म्हणून तर मवसर मनास आणून तुमचा आश्रा पाहून देऊन [नि] मोर्तब सुद किता कलम जजिरे खादेरी व जजिरे कुलाबा जजिरे पदमदुर्ग येथील कोली येही झाडे चापे फणस व उडी व राहट राहटवड व माड खुटाकारणे हुकुमे तोडून नेलिया आहेती ते मेहरवान होऊन त्याची किमती बरहक मजुरा देविली पाहिजे मेहरवान होऊन आगर मामूर करीत आहेती किलेयास इस्ताद पाहिजे सालाबाद राने आहेती तेथे कोलियाही बंदरी गलबते नेऊन सिवारी जागा जागाचे आहेती ते तेथील कारकून असतील तेही जमा करुन हुडकर जमा करुन व कुलबी जमा करुन रास्ती किलेयाचे नावे खर्च लेहेन हुडे व बाजे सिवार बदरी आणून गलबते भरुन किलेयास नेतील यैसी सालाबाद रवेस असोन दरम्याने कोली येऊन धिगाई करुन आगर बसिली तोडून नेताती कोली चाकर किलेयाचे आणि माड मासली मारावयास खुटास नेताती यैसा गहजब होतो मेहरवान होऊन तसवीस दूर जाहालेयान मामुरी होईल म्हणून तर ज्या किलेयास जितकी झाडे नेली असतील त्याचा जाबिता नावनिसी झाडाचा तपसीलवार जाबिता करुन देणे मजुरा पडेल पुढे झाडाची तसवीस न लगे [नि] मोर्तब सुद किता कलम कोण्ही निलोतरी वाडीमधे करितो त्यासी फर्मास करिताती सालाबाद रवेस आहे रास्ती किमतेन बागवानापासून फर्मास चालऊन त्याचे जरिबेयामधे मजुरा देताती येसी रवे आहे तरी साहेब मेहरवान होऊन निलोतरीची फर्मा दूर केली पाहिजे म्हणून तरी सुखे मामुरी करणे येकदर तसवीस लागणार नाही जे खरीदी करणे ते बाजारात खरीदी करुन तुम्हास तसवीस न लगे कोण्ही जुलूम जाजती करील त्यास ताकीद होईल [नि] मोर्तबसुद किता कलम फर्मास झाप सालाबाद रवेस आहे हवालदार व मजमुदार यारिदीयास झाप द्यावे यैसियास सुभे व जुमले व फूट हवाले व बाजे यास झाप देविताती तेण्हेकरुन आगर खराब होतो त्याची तसवीस दूर केली पाहिजे म्हणून तरी कोटवाडा खाजगी व मामला याचा शाकार करावयास दर माडस झाप २ दोन प्रमाणें देणे वरकड ज्याजती होईल त्याची रास्ती किमती देऊन [नि] मोर्तब सुद.
किता कलम कोण्ही खुटियास आहे याची झाडे हसिली व माड कोलियास चापे व फणस मागताती याची तसवीस दूर केली पाहिजे म्हणून तर अजीपासून जाहाले ते जाहाले याउपर तसवीस न लगे [नि] म्रोर्तब सुद किता कलम बागायेतप्रमाणे जिरायेत आहेत ते ख्रराबा आहे ते बदल मामुरी च्यार साला इस्तावा देविला पाहिजे म्हणुन तरी दुसाला इस्तावा करुन देऊन [नि.] मोर्तब सुद
किता कलम सरदेसमुखी जे जमाबंदी आकारेल त्यामधे सरदेसमुखी वजा करुन बाकी बेरीज राहील त्याचा वसूल घेणे ज्याजती तसवीस न लावणे म्हणून तर अकार होईल त्यात सरदेसमुखी वजा करुन उरली बेरीज वसूल घेऊन जाजती तसवीस न लगे [नि] मोर्तब सुद किता कलम माहाल मजकूरचे कारकुनी वरातदाराबदल हसिली झाडे व माड विकताती हे रवेस नाही झाडे आमची पोटीची लेकरे तोडिताती आगर खराब करिताती हे कारकुनी नव्हे साहेब मेहरवान होऊन कारकुनास ताकीद फर्माऊन झाडे न तोडावी ये बाबे कौल दिधला पाहिजे म्हणून तर अजी तागायेत झाडे तोडिली असतील त्याचा जाबिता करुन मामला पाठवणे विल्हे करुन याउपर कारा [कुन] वरातदारास झाडे हसिली विकोन देतील त्या [सता] कीद करुन झाडे विको [न देण्हा] र नाही जाणिजे [नि.] मोर्तब सुद किता कलम सुपारी व माड व बाजे झाडे कुल आगराची तोडून नेली आहेती त्याची किमती मजुरा देविली पाहिजे पाहणी बाद देविली पाहिजे म्हणून तरी झाडे सुपारी व माड तोडिले असतील त्याची बेरीज होईल ते बाद देऊन जाणिजे [नि] मोर्तब सुद किता कलम वसाहत जाहालेयावर हरकोण्हावर बाकी बकाया असेल त्याची तसवीस लागलेयान खराबा होईल बाकी मेहरकसी करुन मेहरवान होऊन माफ केली पाहिजे म्हणून तरी हजीर कुलावर बाकी असल ते हाजीर कुलाचे फाजील असल त्यात मजुरा देऊन जाणिजे [नि] मोर्तब सुद किता कलम आम्ही रयेती सन सितापासून त॥ सन समान पावेतो परागदा आहो आमचे जागेयाचा उछेद जाहला वख्ताचे खावयास नाही आपले जागेयास जाऊन जमिनीवर कस्ट मशाखत करुन आपला जीवमात्र वाचऊन आपले जीवाबदल व मामुरीबदल आम्ही रयेती मिलोन आपला हर येक बाब [कस्ट] करुन दूरम्याने कोण्ही दबावितील त्याची तसवीस न लगे ते केले पाहिजे म्हणून तर जो कोण्ही गैर करील त्यास ताकीद करुन दूर करुन जाणिजे [नि] मोर्तब सुद.
किता कलम फाजील सालगुदस्ताचे देणे रयेतीचे आहे ते मजुरा देविले पाहिजे म्हणून तर हजीर कुल असेल त्याचा जाबिता करुन मामला पाठवणे विल्हे करुन मामला पाठवणे विल्हे करुन जाणिजे [नि] मोर्तब सुद किता कलम बागायेतामधे जिरायेत खराब आहे त्याची तसवीस दूर केली पाहिजे म्हणून तर त्याची तसवीस न लगे मामुरा रास्ती होईल ते घेऊन जाणिजे [नि] मोर्तब सुद.

सदरहुप्रमाणे कलमाचे कलम मनास आणून तुम्हास कौल दिधला असे सदरहुप्रमाणे हुजूर राजश्री पत स्वामीचे सेवेस लेहोन व सुभा माहलानिहायेचे सुभेदारास बखैर लेहेन तुम्हास कौल आणून कोण्हे बाबे सक न धरणे राजीनामाप्रमाणे कौल आणून देऊन कौल असे [नि] मोर्तब सुद
तेरीख ३ माहे मोहरम
मोहरम
[कागदांतील प्रत्येक कलमापुढें व लेखाचे शेवटीं ‘मोर। तबसु । द’ असा बदामी मोर्तब.]

N/A

References : N/A
Last Updated : February 25, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP