मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें|
पांडुरंगकविकृत पदें

पांडुरंगकविकृत पदें

अनेककविकृत पदें.


पद १ लें
दयासिंधू तूं धांव रे ! माधवजी ! ॥ध्रुवपद.॥
काय करूं मज कांहिं सुचेना ।
भवभयभेणें जिव माझा हा बावरे ! ॥माधवजी!०॥१॥
गांजिति मज हे दुर्जन सारे ।
तुजवांचुनि मज कोणिच नाहीं रे ! ॥माधवजी!०॥२॥
रामकृष्णपदीं तल्लिन झालों ।
पांडुरंगाचें मन वांछित भाव रे ! ॥माधवजी!०॥३॥

पद २ रें
चपल उडि घाल ये हरि ! लौकरी धांवत गोविंदा सदया ! ॥ध्रुवपद.॥
गांजिति हे मज वरी सारे । न कळति तुजला हाल ये ॥चपल०॥१॥
या समयीं प्रभु आश्रम नाहीं । चालुं नको तूं चाल ये ॥चपल०॥२॥
रामकृष्ण कनवाळ दयाब्धी । पांडुरंग तव बाळ ये ॥चपल०॥३॥

पद ३ रें
बाई ! सद्गुरु राजा गे ! भेटला । आजि दिवस सोन्याचा वाटला ॥ध्रुवपद.॥
बहु मनोरथ माझा पुरवीला । कांहीं संदेह नाहीं हो ! उरवीला ॥बाई०॥१॥
कंठ माझा ग ! सप्रेमें दाटला । सोहं सदोदित पाहा हो ! थाटला ॥बाई०॥२॥
शांति विरक्ती स्वाद हा चाखिला । कैसा भक्ताच मान हा राखिला ॥बाई०॥३॥
भवसिंधू हा बिंदूसा भासला । पांडुरंग त्या निजसुखें हांसला ॥बाई०॥४॥

पद १ लें
काय करूं आतां । मन मानित नाहिं ॥ध्रुवपद.॥
दृष्टश्रुतानुमानातें दावुनि । परि न वळे ॥काय०॥१॥
क्षणिकसुखेच्छया धांवतसे बहु । विषविषयीं राही ॥काय०॥२॥
यास्तव हे हरे ! शरण पदीं तव । पांडुरंगा पाहीं ॥काय०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP