मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें| गुरुदासकृत पद अनेककविकृत पदें अनुक्रमणिका आदिनारायणकृत पदें निजानंदस्वामिकृत पदें शिवदिनकेसरीकृत पदें रंगनाथस्वामिकृत पदें शिवरामस्वामिकृत पदें मध्वनाथस्वामिकृत पदें नरहरिकविकृत पदें महिपतिकृत पदें गोपाळनाथकृत पदें आत्मारामकविकृत पदें गंगाधरकविकृत पदें पांडुरंगकविकृत पदें श्रीधरस्वामीकृत पदें श्रीधरस्वामीकृत पदें परमानंदकविकृत पद जनार्दनकृत पद राघवकविकृत पदें बल्लवकविकृत पद रामकविकृत पदें भुजंगनाथकृत पदें कोकिळकविकृत पद निरंजनकृत पदें कृष्णदयार्णवकृत पद शुकानंदकृत पदें हरिकविकृत पद निंबराजकृत पद दीनानाथकृत पद माधवकविकृत पद हनुमंतकविकृत पद शिशुमतिकविकृत पद गिरिधरकविकृत पदे मानपुरीकृत पद व्यंकटसुतकृत पद जिवनतनयकृत पद गोसावीनंदनकृत पदें गोपालात्मजकृत पदें जयरामात्मजकृत पदें शिवरामात्मजकृत पद त्र्यंबककविसुतकृत पद गंगाधरात्मजकृत पद शिवदासतनयकृत पद रामतनयकृत पद अनंतकविसुतकृत पद शुकानंदनाथतनयकृत पद राजाराम प्रासादीकृत पदें माणिकप्रभुकृत पदें रविदासकृत पदें जगजीवनात्मजकृत पद प्रेमाबाईकृत पदें गुरुदासकृत पद नारायणबोवाकृत पदें शिवदासात्मजकृत पदें वासुदेवस्वामीकृत पदें सुभरावबावाकृत पदें माधवकृत पदें अनामकविकृत पदें वासुदेवा दीनानाथा । कमललो... गुरुदासकृत पद अनेककविकृत पदें. Tags : kavimarathipadकविपदमराठी गुरुदासकृत पद Translation - भाषांतर नटवर नट नागर, अतिसुंदर, अधरिं धरूनि वाजवी पावा ।तो माधव बहुतचि बरवा ॥ध्रुवपद.॥ठेउनि देहुडा पाये, उगडा उभा ग माय, पाहे दुरून अवलोकून ।कसी केली वाकडी मान ॥सांवळी सुरत बरि, कवळी साजरी, तनु ज्याची श्यामवर्ण ।दोन्ही डोळे आकर्ण ॥सुंदर त्रिवली पोट, पोवळ्यासारिखे होट, मंदस्मित हास्यवदन ।पाहतां निवती नयन ॥चाल ॥ किरीट कुंडल वनमाळा हो ! ।कांसे पितांबर पिवळा हो ! ।कटीं शोभत असे मेखळा हो ! ।भाळीं केशरिचा टीळा हो ! । उठाव ॥ पायिंचीं भूषणें, वाकि बाळी पैजन, खणणण गज चाले जेव्हां ।रुणझुणझुण वाजति तेव्हां ॥नटवर०॥१॥वाजवि सुंदर मंद मधुर मुरली सप्तस्वर अतिस्वानंदें ।तों नादें अंबर कोंदे ॥करितां गायन डोले आपण डोलि थैथै नाचे प्रभु स्वानंदें ।हरी घागुरियाचे छंदें ॥हाव भाव दाव धरूनि ताल थकथक तोडितो गोविंदे ।डोले शिव ब्रह्मानंदें ॥चाल ॥ झाले मनिं लज्जित गंधर्व हो ! ।नारद तुंबर हे सर्व हो ! ।ह्मणती गायन अपूर्व हो ! ॥हरिला सर्वांचा गर्व हो ! ॥उठाव ॥ नकळे तयाचे गुण कळा तो सकळकुळींचा कुळठेवा ।हरि विश्वाचा विसावा ॥नटवर०॥२॥मदनमोहन घनश्याम सुंदर हरि हातीं घेवोनी काठी ।उभा कालिंदीतटीं ॥पांघरुनि घोंगडी काळी बरी साजरी धांवत असे धेनुपाठीं ।पळती गाई आव्हाटी ॥वळुनि गाई सार्या बर्या आपण मग सांगे गोपाळां गोष्टी ।बाप माझा जगजेठी ॥चाल ॥ नकळे कीं ज्याचा महिमा ।पार अगमा निगमा ।शिणला चातुरमुख ब्रह्मा ।तो भुलला भक्तिप्रेमा ॥उठाव ॥ गुरुदास म्हणे नकळे माव तुझी धाव पाव उद्धरिं देवा ! ।येऊं द्यावी माझी कणवा ॥नटवर०॥३॥ N/A References : N/A Last Updated : March 18, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP