मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत| समृद्धि आणि प्रीति केशवसुत प्रियेचें ध्यान सृष्टि आणि कवि कविता आणि कवि अढळ सौंदर्य अपरकविता दैवत दुर्मुखलेला एका भारतीयाचे उद्गार एक खेडें मित्राचि खोली गोष्टी घराकडील मुळामुठेच्या तीरावर एका तरुणीस ईश्वराचा ग्रंथ पहिला प्रश्न रा. वा. ब. पटवर्धन जग प्रियेचें सौंदर्य प्रीति समृद्धि आणि प्रीति मजुरावर उपासमारीची पाळी प्रयाणगीत विकसन पुष्पाप्रत प्रत माझा अन्त कविता आणि प्रीति स्वप्न सृष्टि, तत्त्व आणि दिव्यद्दष्टि स्वर्ग, पृथ्वी आणि मनुष्प सिंहावलोकन दिव्य ठिणगी पुष्पमाला भृंग प्रीतीची भाषा कल्पकता रूढि-सृष्टि-कलि कवि फुलांची पखरण पुष्पाप्रत फूलपांखरू शब्दांनो ! मागुते या ! दिवा आणि तारा ‘ पण लक्षांत कोण घेतो ?’ च्या कर्त्यास मयूरासन आणि ताजमहाल चिरवियुक्ताचा उद्गार संध्याकाळ आहे जीवित काय ? भास तुतारी झपूर्झा थकलेल्या भटकणाराचें गाणें प्रीति आणि तूं कवितेचें प्रयोजन मूर्ति दोन बाजी सृष्टी आणि कवि दिवस आणि रात्र दंवाचे थेंव स्फूर्ति रांगोळी घालतांना पाहून मूर्तिभंजन रुष्ट सुन्दरीस काव्य कोणाचें ? पद्यपंक्ति कविच्या ह्रदयीं जसें गुंगती -- फार दिवसांनीं भेट नवा शिपाई प्रणयकथन नैऋत्येकडील वारा वियोगामुळें निशाणीची प्रशंसा वातचक्र सतारीचे बोल “ कोणीकडून ? कोणीकडे ? ” दिवाळी म्हातारी आम्ही कोण ? घुबड वियुक्ताचा उद्गार स्मरण आणि उत्कण्ठा आईकरितां शोक फिर्याद दूर कोठें एकला जाउनीयां प्रतिभा गोफण केली छान ! मनोहारिणी हरपलें श्रेय खिडकीकडे मौज पहावयास उगवत असलेल्या सूर्यास मरणकाल जयाजीराव शिंदे व तुकोजीराव होळकर जरी तूं ह्या येथें असतिस नाहीं ज्यापरि डोंगळा गांवीं गेलेल्या मित्राची खोली सर्ग १ ला आगबोटीच्या कांठाशीं मदन आणि मदनिका जास्वंदीचीं फुलें, आणि पारिजाताचीं फुलें अहा पक्षी हे चित्र पक्ष यांचे ! कामान्धत्व जायाचें जग का असेंच ? मजुरावर उपासमारीची पाळी प्रयाणगीत मुलांस झोडपणार्या एका पंतोजीस जगामधीं या तुला कशाला परमेशें धाडिलें ? समृद्धि आणि प्रीति तत्त्वतः बघतां नामा वेगळा० इत्यादि समृद्धि आणि प्रीति केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे. Tags : kavyakeshavasutpoemकविताकाव्यकेशवसुतमराठी समृद्धि आणि प्रीति Translation - भाषांतर श्लोक एक दुसर्यास म्हणतो :- आहे द्वीप सुरेख एक सखया त्या दक्षिणेच्या दिशे, लंकेचें अजुनी भलें शकल तें राहूनि तेथें असे;शोभे तें दिवसा सरित्पतिवरी, तेव्हां गमे इंदिरावैकुण्ठाहुनि पातली आपुलिया ताताचिया ही घरा ! ॥१॥तेतें कांचनमन्दिरें तळपती सम्पत्तिनें कोंदलीं,उद्यानें जणुं काय नन्दनवनें स्वर्गाहुनी आणिलीं,सारे भोग सदैव सिद्ध असती संगीतवाद्यादि ते;तेथें जाइल आयु साच मजला स्वप्नापरी वाटतें ! ॥२॥येतें कां तुझिया मनांत वसुनी भोगां तिथें भोगणें ? आधीं हें चुकलों परन्तु तुजला सांगावया सांगणें - कीं तेथें न शके कुणी पुरुष तो स्त्री आणण्याला कदा,सीताशाप असे अलंघ्य असला द्वीपावरी त्या सदा ! ॥३॥दुसरा पहिल्यास :- सीताशाप जरी मुळींच नसता त्या द्वीपखण्डावरी,न्यायाला मजला जरी गवसती तेथें सखी अंतुरी,येतों मी न तरीहि तेथिल सुखें तीं भोगण्या आयतीं,जीं प्रीतीस मला अमे ढकलती शब्दावशेषाप्रती. ॥४॥सीताशाप परन्तु त्यावरी असे दुर्लंघ्य आतां तर;तेव्हां पौरुषपूर्ण कोण असला राहील तेथें नर ? आम्हांला रुचती न तीं श्रमफलें कान्ते दिल्यावांचुनी,तेथें सेविल कोण अश्रमफलें तीं एकला राहुनी ? ॥५॥तूं माझ्याकरितां तरी हुडकुनी तें द्वीप रे काढणें,जेथें रान भयाण फार असती कांटे कडे वांकणें,जेथें वन्य पशू सदा डिरकती हिंसा जयांना प्रिया;तेथें घेउनियां प्रिया मग मला आज्ञा करीं जावया ! ॥६॥कांटे झाडिन मी, पशू वधिन मी, किल्ला तिला बांधिन,मी तेतें सुख व्हावयास अपुले हे प्राणही टाकिन;बांधूं आम्हि परस्परांप्रत लताजालीं सुखानें गळीं;स्वर्गाला निरयामधूनि पहिल्या काढूं अम्ही त्या स्थळीं ! ॥७॥ N/A References : N/A Last Updated : March 15, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP