मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|ऐतिहासिक पर्यालोचन|
गोत्राचा निर्णय ग्रंथांवरून पाहिजे

गोत्राचा निर्णय ग्रंथांवरून पाहिजे

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


सदरील प्रश्नात दोन पोटप्रश्न आहेत. त्यांत पहिला प्रश्न गोत्रासंबंधाचा आहे, व त्याचे उत्तर म्हटले म्हणजे हे गोत्र अर्थात माहेरचे घ्यावयाचे की सारचे घ्यावयाचे, का दोन्ही गोत्रांपैकी पाहिजे ते घेणे हे ऐच्छिक समजावयचे, याचा निकाल लागला पाहिजे. पराशरस्मृती स्त्रीपुनर्विवाहास अनुकूल खरी, परंतु तिजमध्ये गोत्रव्यवस्थेबद्दल काही सांगितले नसल्यामुळे तिच्या आधारे प्रत्यक्ष विवाहकृत्य घडवून आणिता येत नाही, असा रूढिभक्तांचा या ठिकाणी एक कोटिक्रम होत असतो; परंतु त्या कोटिक्रमाकडे तादृश लक्ष देण्याचे कारण नाही. का की, प्रत्यक्ष वेदकाळी, व त्यानंतर पांडवांच्या काळी जर विधवांचे पुनर्विवाह धडधडीत होतच होते, तर त्या वेळी गोत्रासंबंधाची व्यवस्था कोन्ती तरी ठरलेली असलीच पाहिजे.
तसेच पराशराने सांगितलेल्या आपत्तींच्या संख्येपेक्षा निराळ्या संख्या ज्या स्मृतिकारांनी सांगितल्या आहेत, त्यांच्या वेळीही या बाबतीत काही तरी ठरीव धोरन लोकप्रचारात चालत असेलच, व यावरून गोत्रसंबंधाचा निर्णय पराशराने सांगितलाच पाहिजे होता असे म्हणण्याचे कारन रहात नाही. ही व्यवस्था अगर धोरण यांचा शोध ग्रंथान्तरी लाविणे हे आपले कर्तव्य आहे, व तो न लागू शकेल तर याबद्दलचा निर्णय पुनरपि नवीन करून घेतला पाहिजे.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP