मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|स्फुट काव्यें|
काळभैरवस्तुति

काळभैरवस्तुति

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


( गीतिवृत्त )

श्रीकाळभैरवा ! त्वां, विघ्न निवारूनि, रक्षिल्या यात्रा.
गात्रास तसा जपसी, जैसा शरणागता कृपापात्रा.     १
मंगळवारीं वांटिति, भावें तुज नमुन, सेरणीला जे,
त्यांस प्राकृतजनता, जेंवि सुरतरूंसि सेरणी लाजे.     २
जन कृतकृत्य, स्मरतां नमितां तुज, काळभैरवा ! होतो
कीं म्हणसि, ‘ स्वस्थ रहा; तुछ कळि यथेष्ट वैर वाहो तो     ३
तज्ञ म्हणति, ‘ जन पावे काशीतें, नमुनि दंडपाणीतें.
स्मरण तुझें सुख देतें, न ग्रीष्मीं मधुर थंड पाणी तें. ’     ४
स्तविति प्राकृत जन तुज, ‘ काशीचा कोतवाल ’ या नावें.
विश्वेश्वरप्रतिनिघे ! प्रेमें त्वां तेंहि योग्य मानावें.     ५
श्रीकाळभैरवा ! मज अंती काशीपुतींत दे वास.
जो शरणागत तुजला, तो बहुमत विश्वनाथदेवास.     ६
तो धन्य, जो तुज करी काशीच्या नमन कोतवालास.
अघ-नाशीं त्वद्द्युतिच्या उद्योगश्रम नकोत वालास.     ७
तूं दीनबंघू देवा ! मी दीन, खरें असें असे नातें.
मज रक्ष भैरवा ! बा ! तुज कार्य अशक्य जें असेना तें.     ८
सुज्ञ म्हणति, ‘ विघ्न पळति, भय पावुनि, काळभैरवध्यानें.
काय करावें प्रभुसीं, अपराध करूनि, वैर वध्यानें ? ’     ९
श्रीकाळभैरवा ! तव चरणेंचि प्रणतदोष दापावे.
त्वदनुमतें विश्वेश प्रभु बापा ! दीनतोषदा ! पावे.     १०

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP