प्रसंग चवथा - पुण्य पुरुष लक्षण

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.



प्रेमें हांसोनि बोलिले सद्‌गुरु । आंवरी सांवरी होई बा स्‍थिरु । ‘ना-भी’ कारूनि दिधला बोधाकारू । पाठी थापटूनियां ॥१८॥
बरा तिळा तांदुळा होऊन । दाविलें शिवशक्तीचें भांडण । आतां शीघ्र करी कां कथन । पुण्य पुरुषार्थाचें ॥१९॥
अशुच शरीरीं शुच आचरावें । निज नामातें हृदयीं धरावें । जैसा बुधला विकला घृताच्या नांवें । अशुच असतां ॥२०॥
हिरवें चर्म रंगल्‍या जालें मोल । आतां नांव पावलें मोट पखाल । शुच उदकामाजी शिरले डोळ । तैसें हरिरंगीं रंगावें ॥२१॥
शरीर जें नामें रंगले मुसलमान । तें शरीर पुजिलें पीर म्‍हणोन । मृत्‍यूहि जाल्‍या चाले महिमान । यालागीं शुभ आचरावें ॥२२॥
पाप आचरितां बहुत होय नरिये जोडी । अनेक दुःखें भोगिती आत्‍माकुडी । तें सांगों आंभिली परवडी । उन्मत्त निववावया ॥२३॥
जैसे तप्त लोहाचेनि संगे। पावक दुःख पावे अष्‍टहि अंगें । तैसा आत्‍मा देहाचेनि संगे। पापें पिंडों पाहे ॥२४॥
पहा कैसे बावन कसी सोनें । नग करितां डांकें जालें उणें । तैसा तुम्‍ही आत्‍मा वोळखा खुणें । देहासंगें हीन जाला ॥२५॥
हें स्‍थूळ देहाचेनि संगती जाण । अनेक अनेक पापें करी गहन । भावे आठवेचि ना निर्गुण । भ्रमण करीतसे ॥२६॥
जे जे भ्रमण करिती अवलक्षणी । ते ते पुढें सांगेन वचनीं । दृढ भाव हा धरावा मनीं । नरा अथवा नारीनीं ॥२७॥
आतां पापाचा कांटाळा धरावा । क्षमा दया शांति सद्‌गुरु आराधावा । द्वैतें द्वैताचा ठाव पुसावा । चित्तापसूनियां ॥२८॥
वरुषें इक्षुदंडा घातलें पाणी । क्षणामाजी चरकीं काढिलें पिळुनी । तैसें वोळखे आत्‍म्‍यालागुनी । देहसुखाचेनि संगें ॥२९॥
उदकें भरोउभरी ते घडीस । अनेक टोले साहे तो तास । तैसा जीव दुःख भोगी सावकाश । हे कुडीचेनि संगे ॥३०॥
तैसी विषयांची भरोउभरी जाणा । अंतकाळीं दु५ख भोगी आत्‍माराणा । यालागलीं धरुनी अकराव्या श्रेष्‍ठ मना -। वरी बैसावें ॥३१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP