विविधविषयपर पदे - यत्न

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


११८५.
( राग-सारंग, ताल-दीपचंदी )
राम वोळे तयाला । यत्न बहुत जयाला ॥ध्रु०॥
खटपट खटपट सांडुनि द्यावी । निश्चळ बुद्धि करावी ॥१॥
तीक्षण तर्क धारणा हे । पावतसे वचनाला ॥२॥
दास म्हणे जो परउपकारी । मानतसे बहुतांला ॥३॥

११८६
( राग-मारु; चाल-साजिरे हो० )
आळस खोटा रे बापा ॥ध्रु०॥
धृष्ट पुष्ट मोठा धाटा । व्यर्थचि ताठा रे ॥१॥
आळस मोठा तोचि करंटा । जाईल कोणे वाटा रे ॥२॥
दास म्हणे रे यत्न आउचटा । वैभव लूटा रे ॥३॥

११८७
( राग-ललित; ताल-धुमाळी )
जेणे आळस केला तो आळसे बुडाला ।
आला अवचिता घाला चर्फडीत निघाला ॥ध्रु०॥
अंतर पडिले बहूत पुढे आली प्रचित ।
तप्त जाले चित्त तेणे अखंड दुश्चित ॥१॥
पहिले आपण चुकला आतां म्हणेल कोणाला ।
जन फिरोन पडिला ऐसा समयो घडला ॥२॥
दास म्हणे या जना नाही दीर्घ सुचना ।
बोला कठिण वचना लोक बोलती नाना ॥३॥

११८८
( राग-कानडा; ताल-त्रिताल )
कष्ट करितो जन ते खाती । येर उगे चि पाहाती ॥ध्रु०॥
शक्तीचे चारी दिवस जाती । पुढे थोर फजीती ॥१॥
आपण केल ते जाले । आळसे जन बुडाले ॥२॥
आळसे आळस ये सुस्ती । चढे उगीच मस्ती ॥३॥
कळेना ऐकेना येना येना । आणि सिकेना ॥४॥
तरतर केली उडोन गेली । अंती होय फजिती ॥५॥
दास म्हणे या वाईट खोडी । पापे घडत जाती ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP