-
नेचे वर्ग, फिलिसीनी
-
नेचाभ पादप (टेरिडोफायटा, वाहिनीवंत अबीजी वनस्पती) या विभागातील एक वर्ग, काही शास्त्रज्ञांनी यात दोन उपवर्ग (स्थूलबीजुककोशी व तनुबीजुककोशी) केले असून त्यापैकी एकात समबीजुक सत्यनेचे (फिलिसीज) व असमबीजुक जल नेचे असे दोन गण अंतर्भूत केलेले आढळतात, फिलिकेलीझ (नेचे गण) व जल नेचे असेही दोन गण मानतात, तरा काही शास्त्रज्ञांनी जलनेचांना नेचे गणातच समाविष्ट केले आहे. वर्गीकरण विवाद्य (विविध) आहे. नेचे वर्गाची प्रमुख लक्षणे - बीजुकधारी पिढीला मूळ, खोड व मोठी पाने एकाआड एक असतात. वाहक उतकांच्या चितीय संरचनेत पर्णविवरे असतात. बीजुककोश पानांच्या अक्षविमुख पृष्ठांवर (मागील बाजूस) किंवा किनारीवर असतात. मुळे क्वचितच नसतात. या वर्गाचा उगम नग्नपादपवर्ग (सायलोफायटिनी) या प्राचीन वर्गापासून झाला असावा असे मानतात. कदाचित या दोन्हीचा उगम सारख्याच पूर्वजापासून झाला असावा. नेचे वर्गाचे तीन उपवर्ग हल्ली बहुतेक शास्त्रज्ञ मानतात.
-
अश्मीभूत प्रारंभिक नेचे (प्रायमोफिलिसीज).
-
स्थूलबीजुककोशी (युस्पोरँजिएटी) - पूर्ण विकसित, परंतु काही प्राचीन व काही विद्यमान नेचे उदा. हंसराज, रातकोंबडा, राजहंस, वृक्षी
Site Search
Input language: