-
पु. १ अव्यवस्थित रीतीनें इकडे तिकडे फेंकलेला रचलेला , किंवा कालविंलेला ढीग ( अन्नाचा , फुलांचा , फळांचा इ० ); चिवडाचिवड ; पखरलेली , चिवडलेली रास . २ ( ल . ) विसकळलेली , नासलेली , भंगलेली , बिघडलेली स्थिति ( कामाची , मसलतीची ). ३ बिघाड ; विसकळलेली , नासलेली , उघडी पडलेली स्थिति ( अब्रूची , नांवाची इ० ). वंगाल्यांतील ब्रह्मो धर्माचा विचका बाबू केशवचंद्रांनीं आपल्या मुलीचा बालविवाह केला म्हणून झाला . - टिले ४ . १४७ . ४ घोंटाळा ; गोंधळ . ५ वाईट गोष्टीचें प्रदर्शन . [ सं . विच् ] विचकणी - स्त्री . १ उघडणें ; दोहीकडे करणें ; विदारणें इ० . २ ( तोंडविचकणी चें संक्षिप्त रूप . ) तोंड वेडेवांकडें करून वेडावणें . [ बिचकणें ] विचकणें - उक्रि . व अक्रि . १ उघडणें ; दोहीकडे करणें , होणें ; मोठयानें किंवा विरूप व किळसवाण्या रीतीनें पसरणें ; वासणें . २ ( ल . ) उघड करणें , पाडणें , पडणें ; जाहीर करणें , होणें . ( गुप्त दोष , व्यंगें ) ३ ( ल . ) नासणें ; मोडणें ; भंगणें ; बिघडणें ( कष्ट , मसलत , काम ). ४ ( शब्दशः ) पाकळया , पानें , ओढून काढणें ; फाडणें ( फुलें , पुस्तकें यांच्या ). ५ विचकटणें पहा . उसकटणें . [ सं . विच् = वेगळे करणें . सं . विकोचन ; विकचीकृ = विकचणें ] विचकणें शब्दापूर्वी नामजोडून अनेक वाक्प्रचार होतात जसें - तोंड विचकणें = १ वांकुल्या , वेडावण्या दाखविणें . २ तोंड उघडणें ; बोलणें . दांत , बत्तिसी विचकणें =( उपहासार्थी ) दांत , बत्तिशी दाखवणें , काढणें ; हांसणें . केस विचकणें = केस विसकळणें . त्याचें विचकलें - ( तो ) नाश पावला , धुळीस मिळाला . विचकून पाहणें - सूक्ष्म दृष्टीनें बारकाईनें पाहणें . विचकोपा - पु . ओरबडलेली , विचकुरलेली , विदारलेली , छिन्नभिन्न केलेली स्थिति . विचक पहा . [ विचकणें ]
-
पु. १ पांढरें फूल येणारा एक प्रकारचा गांठींचा वेल ; वनस्पति . २ ( प्र . इचका ) शिंक्याचा एक साधा प्रकार .
-
०होणें विसकटणें .
-
Site Search
Input language: