-
वि. १ ( कार्य इ० ) सिध्दीस नेणारा ; घडवून आणणारा ; पुरें करणारा ( माणूस , पदार्थ इ० ). २ कार्यसिध्दीविषयीं उपयुक्त ; साधनभूत , उपकारक ( लेख , वचन , पदार्थ इ० ). ३ मोक्षसाधनासाठी जपतप , व्रतवैकल्यें , देहदंड इ० करणारा ( योगी , मांत्रिक ); मुमुक्षु . या विषयातें साधक । त्याजिती नियमें । - ज्ञा २ . ३०३ . उपदेशिलें आत्मज्ञान । तुटलें संसारबंधन । दृढतेकारणें करी साधन । या नांव साधक । - दा ५ . ९ . ४ . ४ मदतनीस ; शिष्य . जालंधर सिध्द महाराज देख । कानिफा तयाचा साधक । - संतलीलामृत ( नवनी . २४३ ). [ सं . ]
-
०ता स्त्री. १ एखादी गोष्ट साध्य करण्याची हातोटी ; सिध्दि . २ प्रसंगमान जाणणें . - होकै ८ .
-
०बाधक वि. उपकारक आणि अपकारक ; अनुकूल आणि प्रतिकूल . २ योग्य ; अयोग्य ; चांगलें कीं वाईट . भलत्यास पैसा देऊं नये साधकबाधक पाहून व्यवहार करावा . साधणें - उक्रि . १ ( कार्यादि ) सिध्द होई असें करणें ; सिध्दीस नेणें . २ करणें ; संपादणें . ३ मिळविणें ; जिंकणें . मत्संकल्प असा कीं साधुनि द्यावीच सर्व भू पार्था । - मोभीष्म ११ . ११ . ४ मारणें ; नाश करणें . - ज्ञा ३ . २१६ . हें शस्त्रेंवीण साधिती । - ज्ञा ३ . २५८ . ५ अनुकूल करणें एकातें साधूनि मारिती । - ज्ञा १६ . ३४४ . ६ पाळणें ( व्रत , विधि इ० ); साजरा करणें , मानणें . ( सण , सुट्टी ). ७ व्याकरण करणें , सांगणें . ८ व्याकरणानुबंधांनीं , शब्दसंयोगानें बनविणें ( शब्द ). - अक्रि . १ सिध्द होणें , तडीस जाणें . २ यशस्वी होणें ; भरभराटणें . ३ सुरळीत चालणें . [ सं . साध् - साधन ] साधणी , साधणूक - स्त्री . १ साधण्याचा व्यापार ; साध्य करून घेणें ; संपादणें ; मिळविणें . २ सिध्दीचा योग्य मार्ग , संधान ; उपाय ; योजना ; युक्ति ( साध्य करण्याची ); घडविण्याचें कौशल्य . जिएं घडितां साधुनूक सरें । विश्वकर्मेयांची । - शिशु ३२८ . साधवणें - क्रि . ( व . ) वश करणें . साधित - वि . १ साधलेला ; मिळविलेला ; तडीअ नेलेला . २ ( व्या . ) गुणधर्मयुक्त ; मूर्त . ३ ( व्या ) उद्भूत ; संभूत ; प्रत्ययादिकेंकरून बनविलेला . याच्या उलट सिध्द . ४ ( व्या ) यौगिक ; संस्कारित ; घटित याच्या उलट मूळ . ५ ( व्या . ) दोन किंवा अधिक अवयव एकत्र होऊन बनलेला . साधितणें - क्रि . साधणें . साधन - न . १ साधण्याचा व्यापार ; संपादन ; प्राप्ति . २ करणें ; बजावणें ; उकरणें . ३ कारणभूत अंगें , पदार्थ ; साहित्य ; सामग्री ; उपकरणें . ४ अवयव ; अंगें ; घटक . ५ योजना ; क्लृप्ति ; उपाय . म्हणते साधनें केलीं अनेक । - एभा १० . ११४ . ६ मध्यस्थ ; अडत्या ; गुमास्ता . ७ धार्मिक व्रतवैकल्यें ( मोक्षप्राप्तीसाठीं ); मंत्रतंत्र , दानधर्म इ० ; अनुष्ठान . ८ ( न्याय . ) निर्णयाला प्रमाणभूत गोष्ट ; प्रतिज्ञा . ९ ( कायदा ). स्थापित करणें ; सिध्द करणें . १० ( औषधें - किमया यांसाठीं ) धातूंवर रासायनिक क्रिया , संस्कार ( विशेषतः पार्यावर ). ११ जोड ; संपादणी . आपल्याकरितां मी नरकाचं साधन केलं . - इंप २९ . १२ नाश ; पराभव . त्रिपुर साधन करावयासी । - गुच १ . ९ . १३ ( व . ) मार . [ सं . ]
-
०चतुष्टय न. ब्रह्मप्राप्तीचे चार प्रधान उपाय . वस्तुविवेक , वैराग्य , शमादि षट्संपत्ति , व मुमुक्षुत्व . - एरुस्व ६ . ५६ . आत्मत्वाचिया विशाळ धोंडी । ठाई ठाई ठेविल्या प्रचंडी । साधनचतुष्टयादि हातगुंडी । दुर्ग पावले शोभेसी । - स्वानु १० . २ . १० .
Site Search
Input language: