श्रीरामायनमः

॥ विश्वाधिष्ठानसच्चिदांनदमय ॥ केवलपरब्रह्मपरात्परअद्वय ॥ गोपालाश्रमरुपीगणेशस्वयें ॥ सदगुरुतो ॥१॥

म्हणेयेकाग्रताकरुनियामनां ॥ ऐकआतांगोसावीनंदना ॥ सविस्तरपंचीकरणरचना ॥ निरोपूंतुज ॥२॥

ब्रह्मींअनादिअध्यस्थजेमाया ॥ क्षोभतांकरीविषमगुणकार्या ॥ विवर्तरुपतेनयेनिश्चया ॥ अनिर्वाच्य ॥३॥

तिच्याठाईचैतन्यप्रतिबिंबित ॥ तयासीईश्वरम्हणतीनिश्चित ॥ जोस्वतंत्रजयाचासंकल्पसत्य ॥ असेजाण ॥४॥

त्याईश्वरेंआपल्याइच्छेनें ॥ सृष्टिव्यवहारकेलाअवलोकनें ॥ द्रव्यशक्त्यायुक्ततमोगुणापासून ॥ भूतेंनिर्मिलीं ॥५॥

अधींकल्पिलेंतेंगगन ॥ गगनापासूनियापवन ॥ पवनापासूनियानिर्माण ॥ जालेंतेज ॥६॥

तेजापासोनिउपजलेंजल ॥ जलापासोनिपृथ्वीकेवल ॥ ऐशीपंचमहाभूतेंसकल ॥ अपंचीकृत ॥७॥

शब्दस्पर्शरुपरसगंधजाण ॥ तेपंचभूतांचेपांचगुण ॥ येकयेकाहूनिअधिककारण ॥ गुणेंकरुनि ॥८॥

येकशब्दमात्रवर्तेगगनीं ॥ शब्दस्पर्शदोन्हीपवनीं ॥ शब्दस्पर्शरुपअसतीतिन्ही ॥ तेजाचेठाई ॥९॥

शब्दस्पर्शरुपरसचतुर्विध ॥ हेगुणउदकींवसतीप्रसिद्ध ॥ शब्दस्पर्शरुपरसगंध ॥ पृथ्वीच्याठाई ॥१०॥

ऐशींतन्मात्रारुपपंचभूतें ॥ सूक्ष्मेत्रिगुणात्मकेंअपंचीकृतें ॥ केवलतमोगुणाधिकेंअव्यक्ते ॥ साध्यत्वजें ॥११॥

वेगळाल्यासत्त्वांशपंचभूतांचा ॥ त्याजपासोनियाज्ञानेंद्रियांचा ॥ सत्त्वींसकलहीअधिदेवतांचा ॥ उद्भवहोय ॥१२॥

आतांज्ञानेंद्रियपंचकजाण ॥ श्रोत्रत्वकचक्षुजिव्हाघ्राण ॥ जडइंद्रियांहूनिविलक्षण ॥ सूक्ष्मचालकें ॥१३॥

पंचभूतांचासत्त्वांशकेवल ॥ एकत्रजालियातोसकल ॥ त्याजपासोनियाउपजेनिर्मळ ॥ अंतः करण ॥१४॥

तेंहीअसेसूक्ष्मचतुर्विधपणें ॥ मनबुद्धिचित्तअहंकारलक्षणें ॥ होयपांचहिज्ञानेंद्रियांसीपूर्ण ॥ सहायजें ॥१५॥

संकल्पविकल्पकरितेंमन ॥ आणिनिश्चयात्मकबुद्धिजाण ॥ चेतव्यपणेंजेअनुसंधान ॥ तेंचचित्त ॥१६॥

अहंकारतोअभिमानधरणें ॥ याचहूंवृत्तीतेंलक्षीआपण ॥ तेंजाणावेंनिर्विकल्पस्फुरण ॥ अंतःकरण ॥१७॥

ज्ञानशक्त्यायुक्ततोसत्त्वगुण ॥ तयाचेंकार्यहेंचिजाण ॥ आतांशक्त्यायुक्तजोरजोगुण ॥ पंचभूतांचा ॥१८॥

हावेगळारजांशयापासूनि ॥ जालीकर्मेद्रियांचीउभवणी ॥ वाकपाणिपादउपस्थआणि ॥ पायुपांचवें ॥१९॥

केवळभूतपंचकाचा ॥ येकवटलाउद्भवपंचप्राणांचा ॥ यांतआणिकपंचवायूंचा ॥ अंतर्भाव ॥२०॥

प्राणअपानव्यानउदानसमान ॥ प्रथमहेमुख्यपंचप्राण ॥ उपप्राणत्यांचीहीअभिधानें ॥ सांगतोंमी ॥२१॥

नागकूर्मकृकलदेवदत्त ॥ आणिधनंजयपांचवानिश्चित ॥ ऐसेदशविधप्राणदेहांत ॥ वर्तताती ॥२२॥

जयाचेनिक्षुधातृषानिर्माण ॥ अहोरात्रींकरीगमनागमन ॥ तोनिश्चयेंवोळखावाप्राण ॥ घ्राणस्थानीं ॥२३॥

दुसरागुदस्थानींतोअपान ॥ जयाचेंअसेअधोगमन ॥ मलविसर्गादिककरणें ॥ व्यापारजे ॥२४॥

आतांव्यानाचेंलक्षणआईक ॥ ज्याचेनिवर्ततीहस्तपादादिक ॥ सर्वशरीराच्याठाईव्यापक ॥असेकैसा ॥२५॥

उदानाचेंअसेकंठस्थान ॥ ज्यालाकरणेंउर्ध्वगमन ॥ नानाप्रकारस्वप्नदाखवणें ॥ निद्रिस्थासी ॥२६॥

समानाचीनाभिस्थलीवस्ती ॥ भोगीभुक्तरसातेंबरव्यारीतीं ॥ समत्वेंपाकासप्तधातूंप्रती ॥ पाववितसे ॥२७॥

नागटाकितसेगुचक्याउद्गार ॥ कूर्मनिमिषोन्मेषउन्मीलनकर ॥ कृकलधांवोनिआपटेबाहेर ॥ नासारंध्रें ॥२८॥

देवदत्तजांभळ्यादेभयंकर ॥ धनंजयगर्जेसिंहनादथोर ॥ ऐसादशविधप्राणांचाप्रकार ॥ जाणावाहा ॥२९॥

हाप्राणकर्मेद्रियांसीहोयसहाय ॥ याकरितांघेतीआपलालेविषय ॥ ऐसींकर्मेद्रियेंनिश्चय ॥ साधनत्वें ॥३०॥

ज्ञानेंद्रियींशब्दविषयतोश्रोत्राचा ॥ स्पर्शत्वचेचारुपविषयचक्षूचा ॥ जिव्हेचारसआणीगंधघ्राणाचा ॥ विषयतो ॥३१॥

कर्मेद्रियीवचनविषयवाचेचा ॥ दानहस्ताचागमनपादाचा ॥ आनंदविषयतोगुह्याचा ॥ पायूचाविसर्गघोषकरीतसे ॥३२॥

ज्ञानशक्त्यायुक्तजोसत्त्वगुण ॥ त्यापासोनिजाल्यानिर्माण ॥ सकलइंद्रियाच्याजाण ॥ अधिदेवता ॥३३॥

श्रोत्राचेंदिशावायुत्वगेंद्रियाचें ॥ चक्षूचेंसूर्यवरुणजिव्हेचें ॥ आणिआश्विनौदेवघ्राणाचें ॥ आधिदैवत ॥३४॥

वाचेचेंअग्निइंद्रहाताचें ॥ पादाचेंउपेंद्रप्रजापतिउपस्थाचें ॥ पायूचेंमृत्युऐसेंजाणसाचें ॥ अधिदैवत ॥३५॥

मनाचेंइंद्रब्रह्मातोबुद्धीचें ॥ चिताचेंक्षेत्रज्ञरुद्रअहंकाराचें ॥ हींअंतः करणचतुष्टयाचीं ॥ अधिदैवतें ॥३६॥

ऐसीहींचतुर्दशअधिदैवतें ॥ अंतःकरणचतुःष्टयासहितें ॥ हींकेवलअसतीनिश्चितें ॥ साधकेंजाणावीं ॥३७॥

पंचज्ञानेंद्रियेंपंचकर्मेद्रियें ॥ पंचप्राणआणिमनबुद्धिद्वय ॥ ऐसासत्नाकलांचासमुदाय ॥ लिंगदेह ॥३८॥

आतांऐकस्थूलपंचीकरणातें ॥ पूर्वींसांगितलींअपंचीकृतें ॥ केवलसूक्ष्मपंचमहाभूतें ॥ तामसजीं ॥३९॥

तींएकएकभूतेंदोंठाईकरुनि ॥ प्रथमअर्धभागतैसाचठेऊनि ॥ द्वितीयअर्धभिन्नभिन्नफोडूनि ॥ चतुर्धाकेले ॥४०॥

त्यांतप्रथमअर्धपांचभिन्न ॥ तयाचेभागऐककोणकोण ॥ अंतः करणव्यानचक्षुरसजाण ॥ आणिगुद ॥४१॥

यांतस्वस्वभागतेटाकिले ॥ अर्धभागाचेभागमेळविले ॥ जेचतुर्धाकेले ॥ येकयेक ॥४२॥

अंतःकरणअर्धभागआकाशाचा ॥ त्यांतमिळालासमानभागवायूचा ॥ तेज भागश्रोत्रशब्दभागजलाचा ॥ पृथ्वीभागवाचा ॥४३॥

दुसराव्यानभागअर्धवायूचा ॥ त्यांतमिळालामनभागआकाशाचा ॥ तेजभागत्वचास्पर्शभागजलाचा ॥ पृथ्वीभागपाणी ॥४४॥

तिसराचक्षुअर्धभागतेजाचा ॥ त्यांतमिळालाबुद्धिभागआकाशाचा ॥ वायुभागउदानरुपभागजलाचा ॥ पृथ्वीभागपाद ॥४५॥

चौथारसअर्धभागजलाचा ॥ त्यांतमिळालाचित्तभागआकाशाचा ॥ वायुभागअपानजिव्हाभागतेजाचा ॥ पृथ्वीभागउपस्थ ॥४६॥

पांचवावायुअर्धभागपृथ्वीचा ॥ त्यांतअहंकारभागआकाशाचा ॥ वायुभागप्राणघ्राणभागतेजाचा ॥ जलभागगंध ॥४७॥

ऐसाभागभूतपंचकाचा ॥ आणिपरस्परानुप्रवेशत्यांचा ॥ आतांआईकसकळांचा ॥ प्रयोजनांश ॥४८॥

अंतःकरणसमानाधारें ॥ शब्दकरुनियावाचाद्वारें ॥ श्रोत्रयोगेंशब्दऐकणेंबरें ॥ घडेत्यासी ॥४९॥

मनव्यानाचेअधारेंवेगे ॥ स्पर्शकरुनियाहस्तयोगें ॥ त्वगिंद्रियद्वारास्पर्शअंगें ॥ भोगीतसे ॥५०॥

बुद्धिउदानाधारेंनिश्चयें ॥ चालणेंचालूनियाजाय ॥ चक्षुद्वारानानारुपेंस्वयें ॥ अवलोकी ॥५१॥

चित्तअपानाच्यायोगेंकरुन ॥ रसनेनेंघेतसेरसपूर्ण ॥ आणिवोर्यमूत्रहोद्रवतसेजाण ॥ गुह्यद्वारें ॥५२॥

अहंकारप्राणाच्याआश्रयें ॥ सर्वगंधघेतसंघ्राणेद्रियें ॥ आणिपरीमलोत्सर्गकार्य ॥ गुदद्वारें ॥५३॥

जेचतुर्दशश्रोत्रादिअध्यात्मवंत ॥ त्याचेसांगितलेंअधिदैवत ॥ आईकविषयव्यापारअधिभूत ॥ चतुर्दश ॥५४॥

श्रोतव्यतेंश्रोत्रांचें ॥ स्पर्शतव्यत्वचेचें ॥ आणिद्रष्टव्यचक्षूचें ॥ अधिभूत ॥५५॥

रसतव्यजिव्हेचें ॥ घ्रातव्यघ्राणाचें ॥ ऐसेज्ञानेंद्रियाचें ॥ अधिभूत ॥५६॥

वक्तव्यतेंवाचेचें ॥ गृहितव्यहाताचें ॥ आणिगंतव्यपादाचें ॥ अधिभूत ॥५७॥

आनंदतव्यगुह्याचें ॥ विसर्गतव्यपायूचें ॥ हेपांचीकर्मेद्रियाचे ॥ अधिभूत ॥५८॥

मंतव्यतेंमनाचें ॥ बोधव्यतेंबुद्धीचें ॥ चेतव्यतेंचित्ताचें ॥ अधिभूत ॥५९॥

अहंकर्तव्यतेंअहंकाराचें ॥ ऐसेंजाणावेंसाचें ॥ अंतःकरणचतुष्टयाचें ॥ अधिभूत ॥६०॥

आकाशाचाशब्दगुणा ॥ सच्छिद्रताधर्मजाण ॥ केवलअवकाशपूर्ण ॥ कर्मत्याचें ॥६१॥

वायूचेशब्दस्पर्शगुण ॥ धर्मतोचांचल्यपण ॥ विहरणादिककरणें ॥ हेंकर्मत्याचें ॥६२॥

तेजाचेशब्दस्पर्शरुपगुण ॥ उष्णत्वधर्महावोळखणें ॥ तयाचेंकर्मदहनपचन ॥ इत्यादिक ॥६३॥

आपाचेशब्दस्पर्शरुपरसगुण ॥ द्रवत्वहाधर्ममुख्यजाण ॥ क्लेदनसकलपिंडीकरण्तेंचिकर्म ॥६४॥

पृथ्वीचेपांचगुणजाणप्रसिद्ध ॥ शब्दस्पर्शरुपरसगंध ॥ कठिणत्वधर्मकर्मातिसिद्ध ॥ धारणादिक ॥६५॥

आकाशयेकगुणवेद्यश्रोत्रासी ॥ वायुद्विगुणवेद्यश्रोत्रत्वचेसी ॥ तेजत्रिगुणश्रोत्रत्वकचक्षूंसी ॥ असेवेद्य ॥६६॥

आपश्वतुर्गुणवेद्यचौघांसी ॥ श्रोत्रत्वकचक्षुजिव्हेंसी ॥ पृथ्वीपंचगुणश्रोत्रत्वकचक्षूंसी ॥ जिव्हाघ्राणांसीवेद्य ॥६७॥

ऐशींअपंचीकृतेंपंचमहाभूतें ॥ केलियातयांच्यापंचीकरणातें ॥ मगस्थूलपंचीकृतमहाभूतें ॥ प्रसवलीं ॥६८॥

तत्कार्यभूर्लोकभुवर्लोकस्वर्लोक ॥ महर्लोकजनलोकतपोलोक ॥ सत्यलोकऐसेसप्तलोक ॥ अनुक्रमे ॥६९॥

अतलवितलसुतलनितल ॥ रसातलतलातलपाताल ॥ चतुर्दशभुवनात्मकसकल ॥ समुदाय ॥७०॥

तेथेंयथायोग्यशरीरेंकैशीं ॥ आणिभोग्यविषयजातत्यांसी ॥ अन्नपानादिकसर्वहीऐशीं ॥ निर्माणजालीं ॥७१॥

एवंकारणसकळ ॥ हामिथ्यामायेचाअसेखेळ ॥ यामुळेंअज्ञानकेवळ ॥ नसतेंभासवी ॥७२॥

येथेंईश्वराचेंदेहत्रयकारण ॥ जीवाचेंदेहत्रयकार्यजाण ॥ त्याचेंखहिसविस्तरविवरण ॥ करुंआतां ॥७३॥

ब्रह्मांडहिरण्यगर्भमायामय ॥ अवस्थाउप्तत्तिस्थितिप्रळय ॥ ब्रम्हाविष्णुरुद्रअभिमानीनिश्चय ॥ जाणईश्वरीं ॥७४॥

तदंशपिंडसूक्ष्मअविद्यामानी ॥ जागृतस्वप्नसुषुप्तिअवस्थातिन्ही ॥ विश्वतैजसप्राज्ञअभिमानी ॥ जीवाचेठाई ॥७५॥

N/A

References : N/A
Last Updated : October 28, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP