निरंजन माधव - सत्यवर्णन

निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.


रामा ! तूं सत्यवादी म्हणवुनि पितरादेश वंदोनि माथां

जासी त्या दंडकातें अनुजसह सुखें जानकीप्राणनाथा ! ।

ऐशी लोकीं पृथा हे नवल मज नसे सच्चिदानंदरुपा

सत्यें हें विश्व सारें विरचुनि अमला स्थापिसी सत्पतापा ॥८१॥

सत्यें स्तंभाविना हें सदन उभविलें ऊर्ध्व तें सप्तताळें

भोंयारें सात केलीं रघुकुलतिलका ! तिष्ठती अंतराळें ।

तेथें चित्रें विचित्रें परम विरचिली देवमर्त्योरगांचीं

नक्षत्रांचीं बितानें रविशशि रचिले दीप अच्छिन्नअचीं ॥८२॥

बोलावें तरि वाक्य तांचि रुततें नाहीं असा दूसरा

हातीं बाण तसाचि एक तुझिया तूं शोभवीसी बरा ।

स्थापावें तरि तांचि आश्रितजना रामा ! यया मेदिनी

अर्थ्यातें परिपूर्ण तांचि करिजे एकचि वेळे धनी ॥८३॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP