मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
नवे पाखरू जा गबरुहि लवा ।...

सगनभाऊ - नवे पाखरू जा गबरुहि लवा ।...

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


नवे पाखरू जा गबरुहि लवा ।

रंग हवा आणवा लाहान छिलवा ॥ध्रु०॥

हिरेखाण दिनमान तेज भाळी ॥

कटि कसुनिया चंद्र कळा काळी ॥

गोरा रंग खुषरंग ओठ पोवळी ॥

गेंद बुंद सुगंध कळी पिवळी ॥

चमकनोक नेत्राची आग जाळी ॥

विष पसरले भिन्नले जिव्हाळी ॥चाल॥

पाहुनि चित्त मन हे गार प्रियकरणी ॥

तु भला मारला वार प्रियकरणी ॥

पडदा अंतरिचा पार प्रियकरणी ॥

जणु बाड चीरिचा वार प्रियकरणी ॥

झालो होतो ठार दिला कलवा ॥१॥

नागुण जहरि डंकीली वर्मी ।

विषय उष्णता चढली आंगी गर्मी ॥

मुहूत केव्हा लागल भर्माभर्मी ।

टणकला जीव जाहला लइ शरमी ॥

भाग्यवंत कंठा वरते सुरभी ।

जशि सुगंधिक दवण्याची तुरमी ॥चाल॥

रंगिती बत्तीशी लाल प्रियकरणी ।

तरतरीत गोरे गाल प्रियकरणी ॥

चाले मस्त गजाची चाल प्रियकरणी ।

थरकावी नथनीचा लाल प्रियकरणी ॥

इचा पायि दौलत सारी डूलवा ॥२॥

रंग गुले नार वय द्वादश वरूषा ।

उरी उसासले गेंद लाहान गरसा ॥

नयन तडाके छातिमध्ये तिरसा ।

धिले गिरावुन सोपटले फरसा ॥

आग भडकली धमकी परपुरुषा ।

लावुनि गेल्या अपसामध्ये चुरसा ॥चाल॥

आज येउ पाहाती प्राण शरतीने ।

ही हिंडवील रानोरान युक्तिने ॥

घालुन गळ्याची आण अगतीने ।

जा भिडून छबिल्या जान जगतिने ॥

लालुच द्रव्याची दावुन भुलवा ॥३॥

शब्द गुणिचे मिठडे ऐकता ।

मान्य वचन हे आज एक मक्ता ।

लाच कशाला भरता खंड मक्ता ।

मुठि भरून पैसा मनमुक्ता ॥

चमकुन पठीया दे झोंक झुकता ।

बाहार लुटू दे जाईचा तक्ता ॥

चाल ॥ घ्या उत्तर आपले स्वस्त राहावे तुम्ही ।

वरकांती करता कष्ट रावहो तुम्ही ॥

विसराळ घराची गोष्ट राव तुम्ही ।

तृप्त व्हा जेउन मिष्टराव तुम्ही ॥

प्रिय उभयता ताजव्यात तोलवा ।

सगन भाऊ म्हणे चौपाळा हालना ॥

रंग हवा आणवा ।

लाहान छीलवा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP