मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह २|
होईजे आपण वचनें उदार । सं...

संत तुकाराम - होईजे आपण वचनें उदार । सं...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


होईजे आपण वचनें उदार । संतुष्ट ईश्वर होय तेणें ॥१॥

शुद्ध सत्वाऐसें संकल्पाचें फळ । पिकलें रसाळ मधुरसें ॥२॥

वचनीं मधुर जिव्हा लागे गोड । तेणें होय वाड भोगी तया ॥३॥

बीजाळ नसतां स्वादें घडे तृप्ति । कृष्णार्पण होती शुद्ध भाव ॥४॥

तुका म्हणे अर्पा भाव विश्वंभरी । सफळ संसारी जन्म तेव्हां ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 19, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP