मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : इतर|
संग्रह ४६

ओवीगीते - संग्रह ४६

सासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.


माझ्या मायच्या मयात निघाला निया नाग

नका मारु भाऊ राखीन केयी बाग ।

माहेराले जाते सांगते तेलनीले

तेल पुरवजा रामाच्या समयीले ।

माय करु माय माय मोहाळाचं मध

अंतरी करा सोध ताकाचं होईना दूध ।

माय म्हटल्यानं ओठाशी ओठ भिडे

मावशी म्हटल्यानं अंतर किती पडे ।

माय करु माय माय काशी गोदावरी

तियेच्या दूधावरी मले दिसली दुनिया दारी ।

माय करु माय माय सोन्याची परात

मायच्या मिचुक नाही गमत घरात ।

माय करु माय माय सोन्याची ईट

समींदराच्या कांठी पानी पेजो दोन घोट ।

माय बापाची मया तुले नाही भाऊराया

एवढा चेटला डोंगर पानी नाही इझवाया ।

भाऊ ग आपला भावजय परायाची

दादा तुझी रानी यीहिन करायाची ।

नको घेऊ साडीचोळी नको येऊ नेयाले

सुखी राह्य दादा मले धीरज देयाले ।

हातात बटवा वानी हिंडतो कहीचा

आई न बापाचा सौदा मिळेना दोहींचा ।

बापराज मह काशीखंडाचा पिंपळ

माजी माय बाई झाड तुळशीच झपाळ ।

बापराज मह काशीमंधी पिंपळ हाले

माजी माय बाई पान्यामंधी नाव चाले ।

बापाजीनं मह्या लय बरं केलं

गाव मांडण्याच्या भोळ्या शंकराले देलं ।

आळंदी करुन जन देहू गेलं पायी

पिता माझा बाप राया रामेश्वर घरी हायी ।

शेजी घाली जेवू महे वर वर बोट

आई घाली जेवू बुडाले मनगट ।

लंबाले महे बाल सरळ मही येनी

जलाल आत्याबाई मह्या माहेराचं पानी ।

दिरानी मही शाहू तू माहेराले नको जाऊ

मोठं आपलं घर मी एकली कशी राहू ।

गेला माहा जीव जवळ नाही कोनी

पाचा पदराची येनी उकलतो माजा धनी ।

गेला माहा जीव कवळी पडली केसाची

माहेर बोरगावच्या वाटे रेज लागली गोताची ।

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP