अभंग १ ला
कल्पनेचे देव कल्पांती नासती । ऐसा वेद श्रुति बोलताती ॥१॥
बोलताती श्रुति सर्व नाशिवंत । जाणिजे शाश्वत परब्रह्म ॥२॥
ब्रह्म ते जाणावे आकाशासारिखें । सत्य ते स्वरुप वेगळेंची ॥३॥
वेगळेंच परी भरलें सर्वांठायीं । रिता ठाव नाहीं तयाविण ॥४॥
तयाविण रिता म्हणती अज्ञान । रामदासें खूण सांगितली ॥५॥

अभंग २ रा
आधीं नमू निरंजनरुपा । दत्तमूर्ती गुणस्वरुपा ॥१॥
निर्गुण निराकार एक । तोचि मायेचा चाळक ॥२॥
ब्रह्माविष्णु त्रिनयन । तिन्ही रुप एकचि पूर्ण ॥३॥
तुका म्हणे शरण जावें गुरुपदीं तद्रूप व्हावें ॥४॥

अभंग ३ रा
अहो चंद्रसूर्य कोण । कोठें मेरुचें आसन ॥१॥
अवघा वायू आहे किती । त्याची कोण्याठायी वस्ती ॥२॥
अहो त्रिकुट तें कोण । कोठें सत्रावींचे आसन ॥३॥
अर्धमात्रा कोठें आहे । दास म्हणे शोधून पाहें ॥४॥

अभंग ४ था
नेत्र चंद्रसूर्य जाण । नाक मेरुचे आसन ॥१॥
अवघा वायु इक मुष्टी । त्याची दशवे द्वारीं वरती ॥२॥
विभव आहे त्रिकुट जाण । जीभ सत्रावीं आसन ॥३॥
अर्धमात्रा क्त । दास म्हणे शोधून पाहे ॥४॥

अभंग ५ वा
कोण्या कारणांसी आलां तुम्ही येथें । सांगाहो आम्हां ते झडकरीं ॥१॥
घरांतुन केव्हां बाहेर निघालां । सांगती घेतला कोण सांगा ॥२॥
आणिली ती वस्तू कोठें ठेवियेली । किंवा गमाविली सांगा मज ॥३॥
वस्तूंचे कारण लागेल बा जेव्हां । कोठे जाल तेव्हा शोधावया ॥४॥
तुका म्हणे वस्तु आहे किंवा नाही । सांगा लवलाहीं गुरुपुत्रा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP