प्रेमगीते - रास-गीत

गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.


गोकुळातल्या गौळणी जमवुन, रासक्रिडा खेळते ।
राधिका कुंजवनीं नाजते ॥ ध्रृ ।
झुळुक वायुची पडे, काननीं ।
स्वर मुरलीचा, सुस्वर, कानीं ।
हर्षात्साहित, खुणवित नयनीं ।
लपे बाजुला इथें ॥१॥
वेणुनाद ते तरंग उठती ।
नकळत पदतल, तयास साथी ।
घेता गिरकी, भानहि हरती ।
`वनमाळी,' पुढति ते ॥२॥
छुमछुम रुमझुम वाजति पैंजण ।
गुलाल उधळित आला मोहन ।
स्पर्श तयाचा होता गालीं ।
नवरंगीं रंगते ॥३॥
मोहन बनली, राधा भोळी ।
कृष्णरुपाची राधा झाली ।
नवरंगातिल स्वप्ने फुलली ।
हरिनयनीं रंगते ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP