देशभक्तिपर गीते - सम्राट नगरी - दिल्ली

गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.


साम्राज्याची विजय पताका, पुण्य नगरिहि दावितसे ।
पहा स्वर्गिच्या सुंदरतेनें, कशी आपणां भूषविते ॥
शिखर असे अत्युच्च जरीं, वैभवचलाचे, गाठियले ।
भडक दृश्य ‍र्‍हासांचे, कैचा डाग काय तेथुनी हाले ॥
तव उदरीं, भक्षिले कितिक नृप, राजघराणी कितीतरी ।
गणति असे कां, काय तयांची, लांछन तुज, वैभवशिखरीं ॥
काय न वाटें, व्यर्थ जिणे तव, नववैभव सुख मिरवावे ।
स्मृतिफलकांवरि वस्त्र ठेवुनी, अंध वृत्तिनें वागावे ॥
बलाढय राष्ट्रे, नूतन नृपती तप अंकावरुनीं जातीं ।
युध्द कथा त्यां, नष्ट पावतीं, कृत्त्ये काय तरीं टिकती ?
दैवाचा वरद - हस्त तव शिरि, अमरत्वहि संपादियले ।
तव भालींचेविधीलिखित हे, सुवर्णाक्षरें कोरियलें ॥
गत - वैभव - चित्र तें उमटते, इतिहासाचें तेच ठसें ।
कारस्थाने, किती रहस्यें नेत्रांपुढतीं येति कसे ॥
गतकालाचीं भीती नच तुला, हतबल होय, तुझ्या पुढतीं ।
तव डौलानें डोल, दिपवि जन-नेत्र वैभवें या जगतीं ॥
रक्षियलें अस्तित्व आपुले, अनेक शतके लोटियली ।
महात्म्य टिकले तेच, खरोखर धन्य धन्य तू पृथ्वितलीं ॥
भरतखंड अरिकंदन करुनी, पंडुनंदनें आक्रमिला ।
इन्द्रप्रस्थ श्रीनगर, स्थापिले, विजय ध्वज मग फडकविला ॥
कळिकाळानें झडप टाकिली, सकळ धुळीला मेळविले ।
भग्न असे अवषेश राहिले, आस्तित्वच कोठे उरले ?
सौभाग्याचा तिलक विझाला, भालीचे वैभव गेले ।
परिदैवाची कृपा दृष्टिही, सद्भाग्यानें तुज वरिले ॥
उदयगिरीं दैदिप्यमान रवि, महाप्रतापें बघ चढला ।
दिड्मंडल भूषविण्य़ां कैसा, नरशार्दुल विजयीं झाला ॥
हिंदुत्वाचा, हिंदभूमिचा तोच, तोच सम्राट पहा ।
खचित नाम, पृथ्विराज शोभे, दुस्मानांचा काळ महा ।
रत्नखचित सिंहासनिं चढला सनाथ करुनीं भूषविले ।
दिल्लिपती सार्थ नाम केले, कोठें ते वैभव गेले ?
नको, नको स्मृति, काय जहाला, कोठें गेला तो नृपती ।
वैराग्याचीं तूच पुरींगे, न कळें तुजला कवण गती ।
यवनांकित, पतित तू जाहली, म्लेंछमय तुला रुप दिले ।
दृश्य अशुभ नच दैवां बघवे, तख्त नृपांचे डळमळले ।
दख्खनतेचें वीर विप्र तुज, पावन करितीं पतिताला ।
गोड दृश्य तरि कुठें खपें, नवसहस्त्र रश्मी मावळला ।
भूमि रुधिरमय, कपट न्याय हा, राज्य बळीचे मग चाले ।
शतक लोटलें असें तो पुढें, आंम्ल बावटा नभि डोले ।
भाविकालचें भविष्य कैचे, काहि कळेंना, मति हटली ।
भाग्याची वा दुर्भाग्याचीं, नाम काय तुजलां द्यावें ।
नेत्रां पुढतीं, प्रश्न हाच, तरि शब्द कोणतें बोलावे ?

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP