देवा तुझे यश गाऊं । तुझी मूर्ति ह्र्दयी ध्याऊं ॥१॥
तुझ्या चरणाते सेवूं । तुजलागी बहु विनवूं ॥२॥
लोटांगणे घालूं पुढती । पायांवरी लोळूं निश्चिती ॥३॥
तुझा घेऊं सदा छंद । जेणे जोडे परमानंद ॥४॥
तल्लीन होऊं तुझ्या नामी । होऊं आम्ही भजन कामी ॥५॥
आलस्याते त्यागोनियां । तत्पर होऊं तुझे पायां ॥६॥
इंद्रियांसी तेथे लावूं । मनालागी दृढ जडवूं ॥७॥
बुद्धि समरस करुं । समाधी हे साक्षात्कारु ॥८॥
ऐशी आमुची वासना । सिद्ध करा दयाघना ॥९॥
तूंच सिद्ध करणार । तूंच आम्हां तारणार ॥१०॥
जैसे असे तूझ्या मनी । तैसे येतसे घडोनी ॥११॥
तूंच एक सिद्ध नाथा । तुजसम तूंच नाथा ॥१२॥
आशाळभूत गुरुराया । शरण आलो तूझे पायां ॥१३॥
विनायक कृपा करणे । उपासना सिद्धी देणे ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP