उत्सवाची मागणी - विघ्ननाशाची मागणी

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


रक्षाबंधनाते कराया कारण । स्वये आवाहन करा देवा ॥१॥
मंत्रोच्चार करुनी बोलवा गणांसि । द्वारी स्थापायासि रक्षणार्थ ॥२॥
आठी दिशाठायी स्थापावे निजगण । व्हावे संरक्षण तव कार्यी ॥३॥
वरी खाली मध्ये गण प्रगटावे । तयानी करावे संरक्षण ॥४॥
विघ्नाते नाशाया शत्रूंते जाळाया । असुरां माराया रक्षा करा ॥५॥
उग्र रुद्रगण वेताळांचे गण । द्वार संरक्षण करोत की ॥६॥
शत्रू सर्व व्हावे देवा पराभूत । त्यांचे कांही न येथ चालावे की ॥७॥
जळोनियां जावे जिवंतची खळ । विघ्नेच केवळ मूर्त जे का ॥८॥
स्थान शुद्धि व्हावी मांगल्ये प्रगटावी । पूर्णता असावी कल्याणांची ॥९॥
विनायक म्हणे निजकार्य करा । वैभव उदारा आम्हांसाठी ॥१०॥
==
कार्यासाठी प्रगटावे । साहाय्याते आम्हां द्यावे ॥१॥
सकळ शुभ प्रगट व्हावे । आनंदाचे लेणे व्हावे ॥२॥
विनायक म्हणे करा । निज उत्सव साजरा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP