वामन जयंती - वामनबुद्धिप्रवेश व उपनिषदभाव

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


वामन जावोनी ठाके बुद्धिपाशी । तया सुंदरासी भुले मति ॥१॥
म्हणे वामनासी तुज काय देऊं । तुज कैसे सेवूं सुकुमारा ॥२॥
वामन म्हणत, पद, मज देई । भूमी पुरे होई त्रिपदमित ॥३॥
बुद्धीमाजी मागे प्रवेश वामन । जडत्व हरण कर यासी ॥४॥
ठाव मिळतां त्यासी सकळ बुद्धी व्यापी । त्रिजग हे मापी बुद्धिमाजी ॥५॥
सकळ विष्णुमय भरोनी रहात । बुद्धिप्रकाशत परंरुपी ॥६॥
सहजचि मग जडत्वगळत । अभिसंधा सुटत सकळची ॥७॥
उपनिषदभाव मग प्रगटत । सकळ स्तब्ध होत विषयांतर ॥८॥
विनायक म्हणे सुतल प्रापण । तेथे नारायण द्वार रक्षी ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP