मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|नृसिंह जयंती| हिरण्यकश्यपूचा वध नृसिंह जयंती विषय हिरण्यकश्यपुच्या चरित्रापासून बोध अदितीची गर्भधारणा हिरण्यकश्यपुची उन्मत्तता देवांची भगवंतास विनंति प्रल्हादजन्म व चरित प्रल्हादाचा पंथ बापाचा कोप हिरण्यकश्यपूचा वध नृसिंह जयंती - हिरण्यकश्यपूचा वध श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन हिरण्यकश्यपूचा वध Translation - भाषांतर आहे का, या स्तंभी, ऐसे विचारत । शिशु तो बोलत सर्वा ठाय़ी ॥१॥अणुरेणुमाजी असे तो भरला । रिता ठाव भला नाही कोठे ॥२॥परम कोपा चढे लत्ता हाणी स्तंभी । आवाज तो नभी थोर होय ॥३॥कडाडिला स्तंभ प्रगटे पद्मनाभ । कोटी-सूर्यप्रतिभ तेजे जो का ॥४॥विकराळ सुख कराळ त्या दाढा । करकरां गाढा खात असे ॥५॥देह तो नराचा वदन सिंहाचे । ऐसे रुप साचे प्रगटले ॥६॥भयभीत झाले सारे त्रिभुवन । मिटुनि लोचन जग राहे ॥७॥पृथिवी कांपली बहु आंदोळली । तेजे म्लान झाली तारकांची ॥८॥सूर्य चंद्र म्लान होवोनि राहिले । भान विसरले सर्व जग ॥९॥नाद थोर झाला ब्रह्माण्डी भरला । सकळ कांपला भूगोल हा ॥१०॥घेतनिज अंकी तया दैत्यालागी । नखे रोवी अंगी देव कोपे ॥११॥संध्यासमयसी दैत्य तो मारीला । भयानक भला अत्युन्मत्त ॥१२॥देव स्वर्गातूनी पुष्पे वर्षताती । गंधर्व ते गाती मधुर स्वरे ॥१३॥अप्सरा नाचती किन्नर आलापिती । घेवोनी आरती देवी येती ॥१४॥सकळही विश्व दर्शना पातले । शरणागत झाले नरहरीला ॥१५॥सांवरेना कोप, न होय शांत, देव । परम कोपभाव, चढलासे ॥१६॥प्रल्हादासी मग पुढे करिती देव । त्याविण त्या वाव उरला नाही ॥१७॥भक्तराज धरी चरण देवाचे । म्हणे काय वाचे बोलावे म्या ॥१८॥स्तवितां प्रल्हाद शांत झाले देव । परम कृपाभाव त्याचेवरी ॥१९॥वरमाग, ऐसे तयास म्हणती । पितया सद्गती मागतसे ॥२०॥विनायक म्हणे ऐसे हे आख्यान । यांत रस गहन भक्तीचाच ॥२१॥ N/A References : N/A Last Updated : January 26, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP