स्कंध ४ था - अध्याय १ ला

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य



मैत्रेय बोलती विदुरा, मनूसी । बह अपत्यांची इच्छा होई ॥१॥
कन्या ‘आकृती’ ते रुचीप्रति देतां । पुत्र जो तियेचा लाभो आम्हां ॥२॥
घेऊनियां ऐसें वचन मुनीतें । अर्पिली कन्येतें स्वायुंभुवें ॥३॥
पुढती रुचीनें केलें बहु तप । लक्ष्मीसवें पुत्र विष्णु लाभे ॥४॥
‘यज्ञ’ ‘दक्षिणां’ हीं नामें तयांप्रति । गुणवंत ‘यज्ञासी’ नेई मनु ॥५॥
उपवर होतां ‘दक्षिणा’ मनूनें । यज्ञास्तव तीतें मागितली ॥६॥
भगिनीही परी लक्मीचि ते होती । यास्तवचि रुचि अर्पी तया ॥७॥
वासुदेव म्हणे असामान्य गोष्टी । केंवी सामान्यासी सौख्यदाई ॥८॥


तोष, प्रतोष, तैं संतोष तो शांति । भद्र, इडस्पती, इध्म, कवि ॥१॥
विभु, स्वन्ह तेंवी सुदेव, रोचन । दंपत्या त्या जाण द्वादश पुत्र ॥२॥
मन्वंतरीं तया पुत्र हेचि देव । ‘तुषित’ तयांस संज्ञा होती ॥३॥
‘यज्ञ’ तो देवेंद्र मरीच्यादि ऋषि । ‘प्रसूति’ मनूची तृतीय कन्या ॥४॥
विरंचीच्या दक्षपुत्राची ते कांता । त्रैलोक्यीं तियेचा वंश बहु ॥५॥
मरीचीपत्नी जे देवहूतिकन्या । ते केला ‘पूर्णिमा’ कश्यपमाता ॥६॥
पूर्णिमासी पुत्र विरज, विश्वग । ‘देवकुल्या’ एक कन्या होती ॥७॥
वासुदेव म्हणे देवकुल्या तेचि । जाहली पुढती गंगानदी ॥८॥


देवहूतिकन्या अनसूया सती । जे अत्रिऋषीसी दिधली होती ॥१॥
दत्त दुर्वास तैं सोम तिचे पुत्र । विष्णु महेश्वर ब्रह्माचि ते ॥२॥
विदुरवचनें मैत्रेय तयाचें । वृत्त अति मोदें कथिती तया ॥३॥
विदुरा, अत्रीतें सृष्ट्युत्पत्तिआज्ञा । होतां त्या ब्रह्मज्ञा तोष वाटे ॥४॥
ऋक्षपर्वतीं ते कांतेसवें जाती । शोभा अपूर्वचि तयास्थानीं ॥५॥
‘निर्विघ्या’ ते वाहे झुळझुळ तेथ । पलाश अशोक फुलले वृक्ष ॥६॥
साहूनियां द्वंद्वें तप शत वर्षे । आचरिती तेथें महामुनि ॥७॥
वासुदेव म्हणे एकपादस्थित । होऊनियां तप करिती अत्रि ॥८॥


देवतुल्य व्हावी संतती हे इच्छा । धरुनियां तपा करिती बहु ॥१॥
तया तपें होई दाह ब्रह्मांडाचा । चिंतूनियांण तदा देवत्रय ॥२॥
हंस गरुड तैं वृषभवाहन । अत्रीचा आश्रम शोभविती ॥३॥
गंधर्व अप्सरा सिद्ध विद्याधर । ऋषि थोर थोर तेही येती ॥४॥
संतोष तयांसी पाहूनि अत्रीतें । स्तवन आनंदें करी त्यांचें ॥५॥
वासुदेव म्हणे देवत्रयस्तुति । महामुनि अत्रि करिती ऐका ॥६॥


देवहो, त्रिगुणें विश्वोत्पत्त्यादिक । व्हावया त्रिवर्ग अवतार हा ॥१॥
पाहूनि तुम्हांसी आनंदलों चित्तीं । वंदितों पदांसी सकलांच्या मी ॥२॥
हंस गरुड तैं वृषभवाहन । अत्रीचा आश्रम शोभविती ॥३॥
गंधर्व अप्सरा सिद्ध विद्याधर । ऋषि थोर थोर तेही येती ॥४॥
संतोष तयांसी पाहूनि अत्रीतें । स्तवन आनंदें करी त्यांचें ॥५॥
वासुदेव म्हणे देवत्रयस्तुति । महामुनि अत्रि करिती ऐका ॥६॥


देवहो, त्रिगुणें विश्वोत्पत्त्यादिक । व्हावया त्रिवर्ग अवतार हा ॥१॥
पाहूनि तुम्हांसी आनंदलों चित्तीं । वंदितों पदांसी सकलांच्या मी ॥२॥
परी महाराज पुत्रकामनेनें । आराधिलें त्यातें दावा मज ॥३॥
आराधितां एका तिघांचें दर्शन । जाहलें पाहून नवल वाटे ॥४॥
ऐकूनियां देव हांसूनि बोलती । स्तविलेंसी ज्यांसी तेचि आम्ही ॥५॥
सत्यसंकल्प तूं होसील त्वरित । कीर्तिमंत पुत्र पावसील ॥६॥
आशीर्वाद ऐसा लाभतां दंपत्यें । पूजितां आनंदें निघूनि जाती ॥७॥
वासुदेव म्हणे एकचि तो त्रिधा । होऊनि अत्रीचा पुरवी हेतु ॥८॥


दिन लोटतां अत्यल्प । दिवस गेले अनसूयेस ॥१॥
ब्रह्मदेवअंशे सोम । विष्णुअंशे तो योगज्ञ ॥२॥
दत्तात्रेय होई पुत्र । शिवअंशे तो दुर्वास ॥३॥
वासुदेव म्हणे आतां । ऐका पुढील वृत्तान्ता ॥४॥


कर्दमकन्या जे ‘श्रद्धा’ भाग्यवती । कांता अंगिराची रुपवती ॥१॥
‘सिनिवाली’ ‘कुहु’ ‘अनुमति’ ‘राका’ । कन्या या तियेच्या सुविख्यात ॥२॥
‘उतथ्य’ तैं ख्यातनाम ‘बृहस्पती’ । पुत्र हे तियेसी बुद्धिवंत ॥३॥
‘हविर्भू’ चतुर्थ कन्या पुलस्त्यासी । अर्पिली तियेसी पुत्र दोन ॥४॥
‘जठराग्नि’ अन्यजन्मीं तो अगत्य । ‘विश्रवा’ तियेस अन्य पुत्र ॥५॥
‘इडविडा’ नामें पत्नी विश्रव्याची । ‘कुबेर’ तियेसी पुत्र झाला ॥६॥
वासुदेव म्हणे तोचि यक्षराज । वंदूं महाराज धनपति ॥७॥


विश्रव्यासी अन्य कांता ते ‘केशिनी’ । पुत्र तीन जनीं ख्यात तिचे ॥१॥
रावण तो कुंभकर्ण, बिभिषण । नामें तया जाण विदुरा, ऐसीं ॥२॥
पंचम कन्या जे गति पुलहासी - । अर्पिली, तियेसी तीन पुत्र ॥३॥
‘कर्मश्रेष्ठ’ तेंवी ‘सहिष्णु’ वरीयान्‍’ । षष्ठ ‘क्रिया’ जाण क्रतुकांता ॥४॥
साठ सहस्त्र ते बालखिल्य तिज । ‘ऊर्जा’ वसिष्ठास दिधली कन्या ॥५॥
चित्रकेतु आदि पुत्र तिचे सात । शक्त्यादि ते पुत्र अन्येप्रति ॥६॥
वासुदेव म्हणे अष्टम कन्येचें । वृत्तही आनंदें कथिती मुनि ॥७॥


अथर्वा ऋषीची ‘चित्ती’ नामें कांता । ‘दधीचि’ तियेचा पुत्र एक ॥१॥
वदन तयाचें होतें अश्वासम । व्रतांत निमग्न सर्वदा तो ॥२॥
नवम कन्या ते ख्याति भृगूप्रति । सत्पुत्र तिजसी होते तीन ॥३॥
‘धाता’ ‘विधाता’ तो ‘कवि’ ही तृतीय । कन्येप्रति नांव जाणावें ‘श्री’ ॥४॥
‘आयति’ ‘नियति’ धाता विधात्यांसी । निजकन्या अर्पी ‘मेरु’ सौख्यें ॥५॥
‘मृकुंड’ ‘प्राण’ त्या अनुक्रमें पुत्र । मार्कंडेय पुत्र मृकंडासी ॥६॥
‘वेदशिरा’ पुत्र जाहला प्राणासी । ‘शुक्र’ तो कवीसी पुत्र एक ॥७॥
वासुदेव म्हणे कर्दमकन्यांचें । वृत्त समग्र हें ध्यानीं असो ॥८॥

१०
‘प्रसूति’ जे कन्या मनुकन्या दक्षाप्रति । दिधली तियेसी षोडश कन्या ॥१॥
बुद्धि, मेधा, श्रद्धा, मैत्री, शांति । तितिक्षा, र्‍ही, तुष्टी, क्रियोन्नति ॥२॥
पुष्टि, मूर्ति, ऐशा त्रयोदश कन्या । मनु अर्पी धर्मा आनंदानें ॥३॥
अर्थ, स्मृति,शुभ, प्रसाद, अभय । सुख, मुद, योग, क्षेम तेंवी ॥४॥
प्रश्रय, दर्प तैं स्मय हे द्वादश । अनुक्रमें पुत्र तयांप्रति ॥५॥
तेरावी ते ‘मूर्ति’ महाभाग्यवती । ‘ईश्वर’ तियेसी पुत्र होई ॥६॥
नरनारायण स्वरुप तयाचें । जन्मकाळीं नादें भरलें नभ ॥७॥
वासुदेव म्हणे प्रार्थिती त्या मुनि । अंतरीं लक्षूनि कृपा त्याची ॥८॥

११
गंधमादनीं ते आले मुनिश्रेष्ठा । तपस्वी वरिष्ठ तपालागीं ॥१॥
कृष्णार्जुन तेचि जाहले पुढती । ‘स्वाहा’ ते अग्नीसी अर्पी दक्ष ॥२॥
पावक, पवमान, शुचि, पुत्र तीन । अग्नीचा अभिमान तयां मोठा ॥३॥
पंचदश पुत्र तयां प्रत्येकासी । अग्नींची ही ऐसी संख्या बहु ॥४॥
यांचियाचि नामें आग्नेयी ते इष्टि । रुचते ज्ञात्यासी यज्ञकर्मी ॥५॥
‘स्वधा’ पितरांसी अर्पिली दक्षानें । ‘अग्निष्वात’ नामें पितर मुख्य ॥६॥
वयुना, धरिणी, कन्या तयां दोन । पारंगत जाण शास्त्रांमाजी ॥७॥
सोळावी ते ‘सती’ अर्पिली शिवातें । ख्यात देहत्यागें जाहली ते ॥८॥
वासुदेव म्हणे शिवाचा अपमान । कथा ते संपूर्ण परिसा आतां ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP