आषाढ शुद्ध ९

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


शिवराय - जयसिंग भेट !

शके १५८७ च्या आषाढ शु. ९ रोजी शिवाजी राजे यांनीं मिर्झा राजा जयसिंग यांची भेट घेतली.
औरंगजेबानें राजा जयसिंग याची नेमणूक शिवाजीचा पाडाव करण्यासाठीं म्हणून केली. त्याच्या हाताखालीं पठाण दिलेरखान हा होता.  दोघेहि महापराक्रमी होते. जयसिंग तर युध्दकौशल्यांत अत्यंत वाकबगार असा होता. परंतु शिवाजीस जिंकणें अत्यंत अवघड होतें. शाहिस्तेखान, जसवंतसिंग, अफलजलखान यांचीं उदाहरणें ताजीं होतीं. ती ध्यानांत ठेवूनच जयसिंग मोठया तयारीनिशीं पुण्यापर्यंत आला आणि लोहगड, पुरंदर व रायगड या ठिकाणी त्यानें युध्द चालू ठेविलें. दिलेरखानानें पुरंदर किल्ल्यास वेढा घातला. या वेळीं मुरारबाजीनें अव्दितीय पराक्रम करुन आत्मार्पण केलें. जयसिंगाचीहि तयारी जोरांत चालली होती. धोरणानें सलोख्याचा तह करावा असा विचार शिवाजीनें केला. आपल्या मनांतील हेतु शिवाजीनें पत्रव्दारें जयसिंगास कळविला. त्यांत लिहिलें, “हे श्रेष्ठ सरदारा, तुझ्यामुळें रजपुतांची मान उन्नत आहे. मीं असें ऐकलें आहे कीं, मजवर हल्ला करण्यासाठीं व दख्खन जिंकण्यासाठी तूं आला आहेस; पण तुझ्या या कृत्यानें देशावर व धर्मावर मोठी आपत्ति ओषवलेली आहे. आपण या वेळीं हिंदु, हिंदुस्थान व हिंदु धर्म यांच्या संरक्षणार्थ फार जोराचे प्रयत्न केले पाहिजेत.” शिवराय जयसिंग यांची भेट ठरली. जयसिंगाच्या शिबिरांत शिवाजी दाखल झाला तेव्हां मोठी खळबळ उडून राहिली. ज्याला त्याला वाटे, शिवाजी काय गडबड उडवितो कोणास ठाऊक, परंतु त्याजबरोबर फारसे लोक नाहींत असें पाहून लोकांचीं अंत:करणें शांत झालीं. आपल्या तंबूला लागूनच शिवाजीला राहण्यासाठीं जयसिंगानें एक स्वतंत्र तंबू दिला. एके दिवशीं रात्रीं मनूची व जयसिंग पत्ते खेळत असतां शिवाजीनें आंत येऊन विचारलें, ‘हे कोण?’ जयसिंगानें उत्तर दिलें, ‘हे फिरंग्यांचे राजे आहेत.’ नंतर मनूची व शिवाजी यांचें पुष्कळ वेळां संभाषण झालें. शिवाजीचा मुक्काम जयसिंगाकडे दोन तीन दिवस होता. शिवाजीचे राष्ट्रप्रेम व त्याचा सध्देतु यांचा परिणाम जयसिंगावर झाला.
- ११ जून १६६५

N/A

References : N/A
Last Updated : September 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP