छंदोमंजरी - परिशिष्ट इ

वृत्त म्हणजे कांहीं नियमित अक्षरांत लघु- गुरुंची विशिष्ट क्रमानें रचना करुन दाखविणें.


आम्हांजवळ असलेल्या छंदोमंजरींत नसलेले, परंतु वृत्तदर्पणांत रामजोशी यांच्या नांवावर घेतलेले श्लोक.
मालती : -
निशिं सुजना तिजला घरीं पहा
नयन सुखावह रत्न हें महा ॥
नगमणि घालुनिया दिसें कशी ।
कनकलता नवमालिति जशी ॥
असंबाधा : -
मोठे दाते ते तनुधनसह गेले कीं ।
स्वर्गा त्यांचे भूवरि सुत नुरले लोकीं ॥
गौळी यांतें तो यदुपति दिसतो साधा ।
भक्तांची जो दूर सहज करितो बाधा ।

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP