सुभद्राचंपू - सर्ग तिसरा

निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.


चूर्णिका.
भक्तपक्षपाती रमापती श्रीकृष्णा । मृगयेनिमितें फिरतां नानावनें । मेध्यमृगसमूह करित कदन । मदनकोटिसुंदरें अकल्पित देखिला वीर अर्जुन । प्राची सरस्वतीरीं पावन । पांथ कार्पटिक कृषगात्र वर्णविहीन । काषायवल्कल परिधान । पंचमलदिग्धांग पूर्ण । जैसा झांकला दिवामणि दुर्दिनें । तैसा स्वतेजतिरोधान करोनि करी भूभ्रमण । सकळतीर्थस्नानें  पवित्रपण संपादोनि निस्पृहत्वें फिरे लोकचर्याजिज्ञासू सूज्ञमणी ॥१॥
ऐसाही जरीं फाल्गुन देखिला । जो परिवारसेवकजनारहित एकला झ। मार्गश्रमें जरी सकला । केशकूर्चस्मश्रुनखवृध्दि दीक्षाबध्दकार्पटिकवेषें जरि झांकला । नानामळे जरीं माखला । तरीं देखतांचि धनंजय । जैसा रत्नपारखी निजरत्न वोळखे तैसा वोळखिला । इंद्रनीळमणिभासुर सुंदरांग इंद्रनंदन देवकी नंदनें ॥२॥
अस्मिन्नवरी माध्यान्हकाळीं । सरिव्दरासरस्वतीजळीं । कृतस्नान आर्द्र मौळी । अर्घ्यप्रदानें तोषवोनि अंशुमाली । प्रसारितबाहू उपस्थानवेळी । सवितृमंडल स्थितनारायण्ध्याननिष्ठ अंतराळीं । बध्ददृष्टि ध्यानोत्सवें परमानंदहृदयीं तत्समयीं । साक्षान्नारायण पार्थदर्शनोव्दिग्रमन । सूर्यमंडलांतर्गत निर्गतध्यानमूर्तीसमान । अनंत मध्यान्हार्कभासुर तेज;पुंज नीलमेघ:शामवर्ण । शैब्य सुग्रीव मेघपुष्प बलाहक असंयुक्तस्यंदन । घणघ्णायमानघंटाध्वनीसीं सुसंपन्न । चतुर दारुकसारथीप्रेरितदिव्य रथीं । अतिरथीमाजि धुरीण यादवपती । कुंतीकुमारें निरखिला । आन्म्द मानिला निजांतरी ॥३॥
श्लोक.
आला हा पक्षपाती हरि निजमनिचा अर्थ तो पूरवाया । आतां भेटेल मातें पसरुनि बरव्या मोकळया चारि बाह्या । केलों मीं धन्य येणें म्हण उनि विसरे पार्थ तो देहभाना । नेत्रीं बाष्पांबु लोटे गदगदित घडे कंठ तैं बोलवेना ॥४॥
चूर्णिका.
समीप देखतां श्रीकृष्ण नयनीं । साष्टांग आंग लोटोनि धरणी । मस्तक अर्पोनि रमाराधितकमलमृदुलचरणीं । अष्टभाव वोसंडला ते क्षणीं । नीर पूर वाहे नीरजदळसदृशलोचनीं ।  अपरमितानंदसंदोह अंत: करणीं । पंडुकुमरा महावीरा ॥५॥
अतसीपुष्पसंकाश नीलवर्ण । मंदहास किरणसंयुक्त वदनचंद्र पूर्ण । कृपाकटाक्ष शोभित अरुणारविंददळनयन । मस्तकीं सूर्यकोटिसंकाश मुगुट विराजमान । कटिदेशीं पीतपट सुवर्णवर्ण । मकरकुंडलघटित उदार समकर्ण । आपादलंबिनी वैजयंती वनमाला पावन । शंखचक्रगदाविंदादि वरायुधसंपन्न । भक्तार्तिनिवारकदीक्षित नारायण । कुमारनारदादिसुभक्तवंदितचरण । सदाचरणसंपन्न नरावतारी अर्जुन निजसखा देखतां आपुण । धन्योहं धन्योहं वचनोच्चारें कृतकृत्यता मानिली ॥६॥
देखताम नवघन: शामला । अर्जुन मनीं विश्रामला । मनोरथतरु उद्दाम अमृतफळेंशीं फळला । किंवा चिंदादावपावकार्दिता अकाळीं महामेघ वर्षला । दरिद्रासि चिंतामणी जोडला । आयुष्यावसानीं धन्वंतरी आतुडला । भुजव्दय पसरोनि कडकडोनि भेटला । चतुर्भुजमूर्तीस सखामणी ॥७॥
सचिदानंदविग्रहपरिरंभ । हृदय मिळतां उदित झाला संतोष स्वयंभ । तो अनिर्वाच्य सकळ भुवनाधारस्तंभ । अंबुजसंभवाद्यखिल जगदारंभ । अमरोरगनरेंद्रमुनींद्रवंदितचरण निजजनभयहरण समारंभे । निज मित्रा पार्था भेटला । सकळ सुखाचा दिवस वाटला । संताप सागर आटला । श्रीकृष्णें करुणाकटाक्षें विलोकितां ॥८॥
तैसाचि आनंद आनंदनिधी श्रीकृष्णमानसा । देखोनि निजसखा अर्जुन प्राण तसा । वियोगविरहव्याकुळ बहुता दिवसां । भेटोनि अत्यंत सुखावला । वत्स घेनूसम पान्हावला । कृपगनतधनप्राप्तिसम धनंजयलाभे संतोष मानिला । पाहे वेळोवेळा आस्यकमळा कमलायताक्ष अंत: प्रेमपुर: सरें नरहारी ॥९॥
प्राचीसरस्वती सरिव्दरातटीं । महावनीं वटविटपिनिबिडछाया तळवटीं । पार्थसखासहित श्रीकृष्ण जगजेठी । अर्ध्यादिपूजा पावोनि संतुष्टी । परमानंदभरीत पोटीं । पुसे स्वागतादि कुशल गोष्टी । सृष्टिस्थिति लीलानाटकसूत्रधार नारायण जगद्‍गुरु ॥१०॥
सर्वज्ञ सर्वेश्वर सर्वांतर्गत सर्वाधार । निजजनकामपूर मंदार । मंदरोध्दर गुणसागर । सुरमुनिजनकिंकरसेवितांध्रिकल्हार । परात्पर परमहर्षें अर्जुनासी अनुवादला ॥११॥
कांरे सखय अकाळींच झणीं । धर्मराज वृकोदर नकुळ सहदेव याज्ञसेनी । परम वृध्द पवित्र पृथाजननी । व्यास धौम्यादि महामुनी । महावैभव इंद्रप्रस्थ राजधानी । त्यजोनि एकलाचि दंडपाणी । किन्निमित्त कार्पटिक वेष स्वीकारिला सद्‍गुणखाणी । अत्यंत श्रम पावलासि नाना देशाटणीं । तीर्थ स्नानें काया पावनी । करोनि आलास हेत धरोनि माझ्या दर्शनीं । सांगोनि शीतळ वचनीं निववी मज ॥१२॥
ऐशी सुधाकल्प मधुरवाणी । भगवन्मुखनिर्गत प्रेमसौरभ्यसहायिनी । ऐकोनि पुरली पार्थाची शिराणी । जैसा नीळकंठ परिसतां नवनीरदध्वनी । परमान्म्दें नाचे देहभान विसरोनी । तैसाचि पांथ परिभ्रमणश्रम कृषगात्र असतां गांडीवपाणी । पीतामृतासमान पुष्टि मानोनि करी कथनी । सकळ वृत्तांत सर्वज्ञशिखामणि श्रीकृष्णचरणीं । भावबध्द पांडुराज प्रियनंदन । सज्जनसंतापपरिहारक चंदन । वंदन करोनि अतिप्रेमें ॥१३॥
सर्वज्ञा तुजला नसे विदित तो वृत्तांत कोठें असे ।
तूं सर्वात्मक वासुदेव पुससी अज्ञानवंतें  जसें ॥
आज्ञा वंदुनि सांगतों परिसिजे त्या इंद्रप्रस्थांतरीं
होतों धर्मसुतासमेत सुहृदीं त्वां ठेविलें त्यापरी ॥१४॥
विप्राचें धन दुष्ट दैत्य हरितां रात्रीं त्वरें पातला ।
आक्रोषें मज धांव धांव म्हणतां देखें व्दिजा विव्हळा ॥
तेव्हां चापनिषंगखड्‍गकलना गेलों गृहाभीतरीं ।
तेथें धर्म निरीक्षिला द्रुपदजासंगें विलासांतरीं ॥१५॥
रात्रीं दैत्य सुदुष्ट चोर वधिला धांवोनियां सत्वरें ।
दिल्हीं तें धनगोधनें मुनिवरा वंदोनि अत्यादरें ।
प्रायश्चित्तनिमित नारदमतें तीर्थावगाहाप्रती ।
आलों स्नान करोनि दुष्कृततरु संछेदिला श्रीपती ॥१६॥
आलों व्दारवतीसमीप तुझिया इच्छोनियां दर्शना ।
तूं आलासि जगत्रयादिजनकाफ़ धांवोनि नारायणा ॥
झालें पादसरोजदर्शन मला जे कोटि जन्मांतरी ।
केली पातकपंक्ति दग्ध घडली मी मुक्त झालों हरी ॥१७॥
झालों धन्य पुनीत मी निजकुळाकोटीसमेतें हरी ।
झालों मी कृतकृत्य आणिक मनीं इच्छा नसे दूसरी ॥
आतां त्वां परमेश्वरा लघुतरा या किंकराकारणें ।
दिल्हें दर्शन हेत पूर्ण घडला झालें दृशा पारणें ॥१८॥
चित्तीं एक असे तुला पुसतसें दासांचिया वत्सला ।
आला नारद मत्पुरीस कथिला वृत्तांत तेणें मला ।
तूझी जे भगिनी सरोजनयना देवी सुभद्रा हली ।
देताहे अपुल्या मतें सुविधिनें दुर्योधना ऐकिली ॥१९॥
नातें ते आमुचें समीप अथवा अंधात्मजाचें हरी ।
तूझी तें अनुजा वरील न कळे कोणा गुणें साजिरी ॥
आहे भाव तुझ्या पदीं नरहरी त्याचा कसा जाणसी ।
आम्ही दास तुझे अनन्य म्हणवों आहों तुझ्या मानसीं ॥२०॥
हेंही वृत्त तुला पुसोनि करिजे बीजें स्वदेशाप्रती ।
चिंता नित्य करी युधिष्ठिर मनीं ते वृध्द माता सती ॥
झालों धन्य कृतार्थ आजि तुझिया सदर्शनें अच्युता
येतों लोभ धरी असोंचि पदरीं तूझ्या अम्हीं सर्वथां ॥२१॥
ऐशी ऐकुनि पार्थभाषितगिरा तोषें हरा त्या वदे ।
तूतें आजि निरीक्षिलें बहु दिसां संतुष्ट झालों मुदें ।
आहे मात यथार्थ नारदमुनी सांगे तसी सुंदरी ।
अर्पावीच सुयोधना म्हणुनियां अत्याग्रहा आदरी ॥२२॥
तूझ्याठायीं सुभद्रा कृतमति विलसे ते न इच्छी परातें ।
मातापित्रामनींही दृढ नियत असे अर्पिजे हे नरातें ॥
एका रामाविना ते अणिक न मनिती धार्तराष्ट्रासि देणें ।
तालांकासी कदांही न वदति पितरें स्न्हेविच्छेदभेणें ॥२३॥
आतां साधीन कार्या तव नियत सखा सांगतों मी उपाया ।
जेणें तूतें सुभद्रा वरिल न लगतां साहसातें कराया ॥
तेव्हां संपूर्ण माझे फळतिल मनिचे अर्थ ते वीरराया ।
योग्यातें योग्य दीजे म्हणति सुजन, ते योग्य तूला वराया ॥२४॥
आले वार्षिकमास संन्निध पहा वीरा ययाकारणें ।
चातुर्मास निवास युक्ताचि असे एका स्थळीं राहणें
यामध्येंच सख्या मनोरथ तुझा म्यां पाहिजे साधिला ।
यासाठीच उपाय एक सुचला तो सांगतो मी तुला ॥२५॥
चूर्णिका.
रैवतनामा गिरिराज वरिष्ठ । तो तंव बळिरामासि परम इष्ट । सदैव ललना समूहसमेत यथेष्ठ । क्रीडा विनोद व्याहाळी उद्देशें प्रकृष्ट । महा भूधरीं रमतसे उत्कृष्ट । वारुणीमदिराप्रसक्त ॥२६॥
रसाधीश्वरारुणप्रेषित । सुरादेवी तरु कोटरीं निवसत । तेथें हलायुध घेवोनि अंगना शत । क्षीब विव्हळित एकांतरत । विजनवनकुसुम -किस- लय - मंडित । सफळ शोभा -विलोकन - मुदित । विविध तांडवादि चेष्टा करी  पूर्णकाम संप्रेमें ॥२७॥
तया पार्वतीं पाहोनि उत्तम दरी । तेथें सुरम्य आश्रम पर्णकुटिका मठिका करीं । होवोनि त्रिदंड - संन्यास वेषधारी । कुटीचक - बव्होदक - प्रकारीं । सानंद तेथें वसती करी । क्रीडार्थ येईल श्रीराम सहपरिवारीं । देखोनि हंसस्वरुप अत्यादरीं । परमहंस -गति परम - प्रीतिपुरस्सर नेयील निजमंदिरीं । यतिजनप्रिय परम दैवत आत्माराम आनंदनिधि भुचनधर्ता ॥२८॥
तदनंतर पुढील कार्याचा संदर्भ परोपरीं । मीच घडवीन तुझा कैवारी । प्रेरक मीं असे सर्वांतरी । आता विशेष चिंता न करीं । निजवृत्ति परम समाधानें धरी । धैर्यावलंबे पांडुतनया प्रतापनिधी ॥२९॥
ऐसें गुह्य कथोनि देवकीजठराकर -नीलरत्नें मुनिजन -हृदयभूषणें नारायणें । करितां निजपुरीस प्रयाण । परम सुभट फाल्गुन । स्वकार्यतत्पर सकळकळा प्रवीण । त्रिदंडसंन्यासवेषांगिकारोन करी गमन । रैवतक महानगरीं प्रवेशला ॥३०॥
त्रैलोक्यव्यापक महागिरी । पाद प्रवेशले पाताळवरी । मस्तक अंतरिक्ष नक्षत्रमंडल घरी । महावन घोरांधारी । जेथें इभ-भग्र -द्रुमाच्या हारी । संघशा फिरती थूप सहपरिवारीं । वासित निमित्ते मदमत्त करी । युध्दसमयीं विदारित- दंत- गंडस्थळ - गळित मुक्ताफळ -निकरीं । वसुंधरा मंडित दिसे बहुपरीं । सुर सिध्द गंधर्व यक्ष किन्नर किंपुरुष सुंदरी । नाना विमळ सलिलासरोवरीं ।
विराजित कुमुदेत्पल -कल्हारीं । निजदयित -नायकसमेत क्रीडाभरीं । निजकुचकलश रेखित कुंकुम मृगमदामोद सुवसित नीरीं । मज्जन करोनि सालंकारीं । रमण करिती वनविहारीं । विलोकितां विस्मय मानोनि अंतरीं । पाहे गिरिराज परशोभा ॥३१॥
जेथें महामृगांचीं गणें । फिरती निबिड नितांत निर्भय मनें । जातिवैर त्यागोनि हर्षायमानें । रामप्रभावशासनें । सिंह शार्दूल गवय गंडक हरिण । रोहित सामर वराह वृक जंबूक शाखामृगाद्यनेकवणें । व्याल नकुल शशकांत सत्वजाति भिन्न भिन्न । पाहोनि कुतुकायमान अंत:करणें । विस्मय मानी पार्थमणी ॥३२॥
जेथें मणिशिला अतिविचित्र । कृष्ण रक्त पीत धवळ हरितमिश्र चित्र विचित्र । स्वदीप्तीनें नैशतमहरणीं स्वतंत्र । स्वप्रकाश करिती दिनकल्प पवित्र रत्नश्रेणी ॥३३॥
सौवर्णराजत ताम्र सीस गैरिक मन: शिलादि धातुखाणी । निजांगरंगें नानावर्णी । तेणें परम शोभायमान धरणी । धरणीधर धरणीधरदयित समर्थ सकळ गुणी । रमवी मना सुजनाचिया ॥३४॥
जेथें कल्पतरुसमान तरुवर । शीतळ छायेशीं मनोहर । सदैव पत्रकुसुम फळभार । आंगीं धरोनि सकळ शरीर । अर्पिती परोपकरणप्रचुर । श्रीराम संतोषकरणी अत्यादरपुर: सर । परमानंदे डोलती । मंद- पवन संचारें वेल्हावती । निजशाखा- कर पसरोनि खेंब देती । अत्यानंदें परस्परें ॥३५॥
रसाळ जंबु जंबीर ताळ । तमाळ हिंताळ नीप निचोळ । अशोक पारिजात प्रियंगु प्रियाळ । जपा दाडिम चंपक चंदन बकुळ । करंज बदर पुन्नाग पाटल । भल्लतक हरीतक बिभीतकामल । धव तगर करवीर कोल कंकोल । खर्जूर केतकी जातिफळ । लोध्र तिंदुक मातुलिंग मंदा वंजुळ । नारिंग नारिकेळ बेल । कदली पूग आम्र आम्रातक तिंत्रिणी विशाल । वटाश्वत्थ पलाश पुष्कळ । अगणित तरुवर अखिल । सपल्लव सपुष्प सफळ रुपें विराजमान । अनेक नगराज शिखरिराज या विराजविती ॥३६॥
जैसे श्रीमंत जन निजमंदिरी । श्रीमदपुष्ट निजदयितासमालिंगनें मुदित मनांतरीं । तैसेचि तरुवर निजवनितालतालिंगनें तोषायमान नानापरीं । माधवी कुंद जायी जायी जूयी मल्लिकादि वल्लाका परिवेष्टित सानंदांतरीं । मदमत्तसमान डोलती । पुष्पविकासें हांसती । कोरकमिसें दंतद्युति प्रकाशिती । अरुण पल्लव मिसें शोणाघर विकासविती । किंशुक मिसें  पीतांशुक परिधान करिती । पिकरव मिसें पंचमराग आलापिती । शुकभाषण मिसें बोलती । केकामिसें निजप्रिय वारि चाहासि बाहती । ऐशा विलासें विलसती । वनकुळ -भूषण तरुण - भूरुहराज निजवैभवें ॥३७॥
ऐसा रमणीय रैवतगिरी । देखतां अर्जुन परमनंदयुक्त मनांतरी । निजवासार्थ सकळ काळ सुखावह पाहोनि दरी । मणिमय गुहांगिकरी ।जल - वात - शीत- सहनक्षम क्षेमकारी । मनरंजनें  निजानंद उव्दोध करी । निरंजन श्रीकृष्ण ध्यानधाराप्रवाहाविच्छिन्न घटणानुकूल बरी । कंदमूळ- फळपुष्पाजळसमृध्दि समीपतरीम । समस्त लक्षण लक्षित धरी श्रीहरी -आज्ञानुसारें हरिताश्वनंदन हरिमित्र हरिध्वज हर्षमानी ॥३८॥
तेथें काषावय्वास वल्कल मृगाजिन पीठ पादुका । बृषी त्रिवेणु सुत्र शिखा । समेत त्रिदंड्धारी संन्यासी नेटका । एकाकी सस्पृहांतर परि निस्पृहासारिखा । वसोनि जन मोहनार्थ मात्र वेष धरोनि निका । निजनेमाचरणें क्रियायोगें श्रीकृष्णकोमलकमलसदृशचरणारिंवदाराधनध्यानैकनिरत पांडुराजतन परम हंसाचर्या आचारे ॥३९॥
नवतुळसीदळमंजरीहरितें । आम्रकिसलयें सुशोभितें । करवीर केतकी  पारिजाते । पाटल चंपक बकुल बिल्व प्रवाळ समेतें । मल्लिका जाती कुंद मंदारयुक्तें । शतपत्राद्यनेकसुमें प्रशस्तें । शामल कोमल दुर्वांकुरें एकचित्ते । श्रीक्रुष्णसहस्रनामादि स्तोत्रपाठनिरत प्रेमांतरें गद्रादितें । पार्थ श्रीकृष्णचरणार्चन करी त्रिकाळीं ॥४०॥
ग्रीष्मऋतुपर्यवसानीं । जलदाकुलगगन निरीक्षतां नयनीं । घनगर्जन विद्युत्पातादि भयप्रदानीं । निर्भयमनें प्रारब्धैकदत्तदृष्टि परमसुखानुभूति मनें सुखासनीं । पांडव - रत्नहार - मध्यमणी । श्रीकृष्णसखा सुकुमारमूर्ति सर्वांगसुंदर नवयौवनमंडित मदनसदृश मनोहर ।पुरनिता -मनांतरीं काम देवमहोत्सव -निर्माणकरी । यतिवेषधारी तपश्चर्या करी अतितोषें ॥४१॥
॥इति सुभद्रास्वयंवरे चंपूकाव्ये कृष्णार्जुनसंदर्शनसंभाषणरैवत
प्रवेशनिवासोनाम तृतीय : सर्ग: ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 28, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP