मन्युना क्षुभितः श्रीमान्समुद्र इव पर्वणि । जात्यारुणाक्षोऽतिरुषा न्यर्बुदं ग्लहमाददे ॥३१॥

नातरी अमावास्येच्या दिवसीं । प्रबळ भरतें महोदधीसी । त्याहूनि बळराममानसीं । क्रोध विशेष प्रज्वलला ॥३॥
क्षोभें आरक्त झाले नयन । दहा कोटि घेतला पण । अक्ष धर्मता ढाळून । रामें तो पण जिंकिला ॥४॥
न्यर्बुद म्हणिजे दहा कोटि । ग्लह जिंकितां राम जगजेठी । रुक्मी मुमूर्ष दुर्मति कपटी । बोलिला गोठी ते ऐका ॥३०५॥

तं चापि जितवान्रामो धर्मेण च्छलमाश्रितः । रुक्मी जितं मयात्रेमे वदंतु प्राश्निका इति ॥३२॥

कपटाश्रयें बोले बोला । म्हणे म्यां हा ग्लह जिंकिला । प्रेक्षक नृपवर्ग बैसला । तुम्हां आम्हांला साक्षी हा ॥६॥
यथार्थ साक्षी हे बोलत । ऐसी रुक्मी वदतां मात । चमत्कार अकस्मात । जाला तेथ तो ऐका ॥७॥

तदाऽब्रवीन्नभोवाणी बलेनैव जितो ग्लहः । धर्मतो वचनेनैव रुक्मी वदति वै मृषा ॥३३॥

गगनीं वाचा अशरीरी । बोलती झाली दीर्घ स्वरीं । रामें जिंकिला ग्लह निर्धारीं । धर्मवैखरी हे जाणा ॥८॥
कपटें रुक्मी बोले मृषा । धरूनि नृपांचा भरंवसा । लज्जा न वाटे गतायुषा । सद्यचि नाशा पावेल ॥९॥
गगनवाणी सर्वां कर्णीं । पडली असतां रुक्मी न गणी । पुढें वर्तली जैसी करणी । ऐकें श्रवणीं ते राया ॥३१०॥

तामनादृत्य वैदर्भो दुष्टराजन्यचोदितः । संकर्षणं परिहसन्बभाषे कालचोदितः ॥३४॥

अनादरूनि नभोक्तीला । रुक्मी दुर्मदें मत्त झाला । दुष्ट रायांहीं प्रेरिला । संकर्षणा उपहासी ॥११॥
पातली अंतकाळाची घडी । काळें बुद्धि प्रेरिली कुडी । रामा हांसोनि दांत काढी । म्हणे वांकुडि नभोवाणी ॥१२॥
हेलना करूनि संकर्षणा । बोले दुरुक्ति उपहासवचना । कालिङ्गप्रमुखां भूपाळगणा । माजी वल्गना करीतसे ॥१३॥
तिया वल्गना ऐक राया । स्वमुखें वदोनि पावला क्षया । त्या तुज कथितों सह श्रोतयां । विवरीं हृदयामाजिवड्या ॥१४॥

नैवाक्षकोविदा यूयं गोपाला वनगोचराः । अक्षैर्दीव्यंति राजानो बाणैश्च न भवादृशाः ॥३५॥

तुम्ही गोपाळ गोरक्षक । गिरिकाननें परीक्षक । अक्षविद्येचें कौतुक । तुम्हां नावेक दूरतर ॥३१५॥
गाईरक्षणें विचरां वनीं । फळमूळांची घेइजे धणी । राजमंडळीं द्यूतक्रीडनीं । तुम्हांलागूनी अयोग्यता ॥१६॥
यवस तरुवर दारुशकलें । गोमय फळ मूळें वल्कलें । यांवीण तुम्हां परीक्षा न कळे । तुम्ही गोवळे गिरिगामी ॥१७॥
निर्यास लाक्षा शिंकीं दोर । मधुमक्षिकासंभव क्षौद्र । इत्यादि आजन्मकृत व्यापार । अक्षचतुर नव्हां तुम्ही ॥१८॥
अक्षक्रीडा खेळती राजे । अनर्घ्य पदार्थ मांडूनि पैजे । कीं लक्ष भेदूनि दाविती ओजें । बाणसंधानें धनुर्विद्या ॥१९॥
समराङ्गणीं द्यूतपणीं । भूप मिरवती चातुर्यखाणी । तुम्हांऐसिया गोरक्षगणीं । गिरिकाननीं मिरवावें ॥३२०॥
हमामा हुंबरी तुमचा खेळ । तुम्हां अनोळख नृपमंडळ । यालागीं नव्हां अक्षकुशळ । रक्षिजे केवळ अजा अविकां ॥२१॥
द्यूत खेळिजे नृपगणीं आम्हीं । अजा अविकें रक्षिजे तुम्हीं । वृथा वाहतां ऐश्वर्यऊर्मी । परि क्षात्रधर्मीं योग्य नव्हां ॥२२॥
एवं द्यूतक्रीडामिसें । बळरामातें विदर्भाधीशें । निष्ठुर निर्भर्त्सितां उपहासें । क्षोभला रोषें तें ऐका ॥२३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP