मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.| पदे ९१ ते ९५ निरंजन स्वामीकृत मराठी पदें. पदे १ ते ५ पदे ६ ते १० पदे ११ ते १५ पदे १६ ते २० पदे २१ ते २५ पदे २६ ते ३० पदे ३१ ते ३५ पदे ३६ ते ४० पदे ४१ ते ४५ पदे ४६ ते ५० पदे ५१ ते ५५ पदे ५६ ते ६० पदे ६१ ते ६५ पदे ६६ ते ७० पदे ७१ ते ७५ पदे ७६ ते ८० पदे ८१ ते ८५ पदे ८६ ते ९० पदे ९१ ते ९५ पदे ९६ ते १०० पदे १०१ ते १०५ पदे १०६ ते ११० पदे १११ ते ११५ पदे ११६ ते १२० पदे १२१ ते १२५ पदे १२६ ते १३० पदे १३१ ते १३५ पदे १३६ ते १४० पदे १४१ ते १४५ पदे १४६ ते १५० पदे १५१ ते १५५ पदे १५६ ते १६० पदे १६१ ते १६५ पदे १६६ ते १७० पदे १७१ ते १७५ पदे १७६ ते १८० पदे १८१ ते १८५ पदे १८६ ते १९० पदे १९१ ते १९५ पदे १९६ ते २०० पदे २०१ ते २०५ पदे २०६ ते २१० पदे २११ ते २१५ पदे २१६ ते २२० पदे २२१ ते २२५ पदे २२६ ते २३० पदे २३१ ते २३५ पदे २३६ ते २४० पदे २४१ ते २४५ पदे २४६ ते २५० पदे २५१ ते २५५ पदे २५६ ते २६० पदे २६१ ते २६५ पदे २६६ ते २७० पदे २७१ ते २७५ पदे २७६ ते २७९ मराठी पदें - पदे ९१ ते ९५ वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathpadनिरंजन रघुनाथपदमराठी पदे ९१ ते ९५ Translation - भाषांतर पद ९१धन्य अजि नरदेह प्राप्त झाला । यानें आत्मलाभ हा मोठा दिला ॥धृ॥तिर्यगादि सर्वही योनिठाई । श्रम जाले ते आतां सांगु काई ॥१॥जन्मोजन्मीं सुकृत बहु केलें । ह्मणोनिया हें फळ प्राप्त झालें हो ॥२॥उपकार मोठासा येणें केला । गुरुकृपापात्र हा होता झाला ॥३॥निरंजन नरदेहालागी वाणी । एथोनिया राहिलीं येणीं जाणीं ॥४॥पद ९२नरदेह योग्य हा उपकारी । याला काय योजितां हो व्यवहारीं ॥धृ॥जन्मोजन्मिं प्रपंच तुम्हीं केला । तेणें काय तुम्हांसी लाभ दिला हो ॥१॥गुरुपायीं ठेवूनि निजडोई । शुद्धतत्व अपुलें पाडा ठाईं हो ॥२॥निरंजन रघुवीर दृष्टि पाहा । प्रेतावानी पडोनि उगे राहा हो ॥३॥पद ९३मरोनिया मारक तोचि जाला । कदाकाळीं पाहुं नये त्याला ॥धृ॥सांडोनिया स्वहित मार्गालागीं । कोकशास्त्र शिकला लागवेगीं हो ॥१॥गुरुकृपें कोणासी प्राप्ति झाली । त्याचे चित्ती संशय नाना घाली हो ॥२॥जैसें श्वान जातसे पिसाळोनी । दुसर्यासि मारिताहे डंखोनी ॥३॥निरंजन सांगतो सर्व लोकां । त्याचे जवळी जाउनि बैसूं नका ॥४॥पद ९४महाराजा सद्गुरु स्वामिराया । कदाकाळीं सोडु नये तुझीया पाया ॥धृ॥तुजलागीं पहातां सर्वकाळ । दु:ख नाहीं पाहिलें कोणे वेळे ॥१॥पापताप दइन्य मजलागी । ठावें नाहीं जाहलें तुझे संगीं ॥२॥आजवरी सुखाचा काळ गेला । एथूनिया वियोग नसो मला ॥३॥निरंजन लोळतो पायावरी । रघुनाथ सद्गुरु कृपा करी ॥४॥पद ९५धन्य धन्य सद्गुरु रघुराया । सर्वावरी सारिखी तुझी माया ॥धृ॥तुझी कीर्ती ऐकूनी बहुतापरी । ह्मणूनिया पातले वेषधारी ॥१॥शास्त्री आनि पंडीत तपेश्वर । सर्व कला कुशल विद्याधर हो ॥२॥परिक्षेसि पहावयालागीं आले । तुज पहातां तयांचे गर्व गेले ॥३॥लागोनिया चरणीं झाले लीन । स्वामिकृपें होउनि निरंजन ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 24, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP