मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामी कृत अभंग| अभंग ११ ते १५ निरंजन स्वामी कृत अभंग अभंग १ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ४९ अभंग दत्तजन्माचे अभंग ५० ते ५४ निरंजन स्वामी कृत - अभंग ११ ते १५ वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : abhangmarathiniranjam raghunathअभंगनिरंजन रघुनाथमराठी अभंग ११ ते १५ Translation - भाषांतर अभंग ११.हिर्याचे शस्त्रानें हिर्याची घडणी । दुसरि करणी नाही तेथें ॥१॥काष्टसंघट्टनीं निघे जैसा अग्नी । काष्टातें जाळूनी टाकीतसे ॥२॥तैसें हें मनानें मनचि मारावें । सहजची व्हावें ब्रह्म मग ॥३॥निरंजन सांगे रघुनाथाची खूण । करा त्याप्रमाणें तुह्मी सर्व ॥४॥अभंग १२.धन्य रघुनाथ सद्गुरू पाहिला । संशय हा गेला ऊठाऊठी ॥१॥वेदशास्त्रें ज्यासी देताती संमत । तें हें मूर्तीमंत दाखवीले ॥२॥बहूत ठिकाणीं पाहियलें ज्ञान । परि ते अज्ञान दिसुनी आले ।निरंजन ह्मणे रघुविरासारिखा । दुजा नाहीं देखा कलीमाजी ॥४॥अभंग १३.रघुनाथ माझा सदुरु सोयरा । नाहीं पारावारा त्याचे गूणा ॥१॥बहूता जनाशी तारक तो जाला । धर्म प्रगटला कलीमाजी ॥२॥एका द्विजालागीं काशिक्षेत्रामाजी । दर्शन जी तेथें त्यानें दीलें ॥३॥निरंजन ह्मणे द्वारके माझारी । दर्शन द्विवारीं मज जालें ॥४॥अभंग १४.दयाळा कृपाळा स्वामि दिगंबरा । कृपेच्या दातारा दीनबंधू ॥१॥संसाराचे संगें बहु कष्टी झालों । त्रितापें तापलों देहसंगें ॥२॥तुजवीन कोण आह्मांसी निर्वाणीं । येई चक्रपाणी धांवोनियां ॥३॥निरंजन ह्मणे देई आतां भेटी । नको करूं कष्ट देवराया ॥४॥अभंग १५.दिगंबरा स्वामि अगा दयाघना । येऊंदे करुणा अनाथाची ॥१॥मायामोहजाल टाकावे छेदून । करावें धावणें दीनबंधू ॥२॥अनाथासि आह्मां तुजवीण आतां । कोण आहे त्राता सर्वापरी ॥३॥निरंजन ह्मणे देई आतां भेटी । नको करूं कष्टी देवराया ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 23, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP