अभंग ४

श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.


( चाल : शंकरा )

प्रणती तुज शंकरा
गिरिजापती शंभो विश्वेश्वरा ॥धृ॥
अर्धांगी पार्वती मस्तकीं गंगा ॥
झुळझुळ पावे शमवी दाहना ॥१॥
सर्वांगी व्यापलेसे फणीवर ॥
त्रिशुल हाती आंगी व्याघ्रांबर ॥२॥
माथा जटांचा असे भार ॥
त्यावरी शोभे चंद्रकोर ॥३॥
भस्मचर्चित तेजोमय शरीर ॥
भाली तृतीय नेत्र वैस्व्हानर ॥४॥
ऐसे गंभीर रुपाचे करूनी ध्यान ॥
अनन्य भावें महादेवा दासी करी नमन ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP